सॅमसंगने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या फ्लॅगशिप Galaxy S सिरीजमधील Galaxy S25, Galaxy S25+ आणि S25 Ultra हे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या तिन्ही फोन्समध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि Android 15 आधारित One UI 7 ओएस असणार आहे.
हार्डवेयरमधी जवळपास काहीच नवीन बदल दिसत नसून फोनचं डिझाईन बाजूने थोड्या प्रमाणात बदललं आहे.पूर्वीच्या Square Shape असलेल्या कडांऐवजी आता गोलाकार कडा दिलेल्या आहेत.
जे काही बदल म्हणत येतील ते यावेळी फक्त सॉफ्टवेयर आणि AI टूल्समध्येच दिसतील. यावेळी या फोन्समध्ये गूगलच्या Gemini AI चा समावेश करण्यात आला असून त्यांच्या स्वतःच्या Bixby सोबत हा काम करेल. या फोन्सचं पॉवर बटन लॉंग प्रेस केल्यावरसुद्धा हे AI टूल कधीही वापरता येईल.
Generative Edit : आता फोटोमधून नको असलेल्या व्यक्तींसोबत त्यांची सावलीसुद्धा AI द्वारे काढून टाकता येणार आहे.
Now Brief : याद्वारे तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या कॅलेंडर किंवा नोट्स व फोनमधील इतर गोष्टींचा अभ्यास करून एक सारांश तयार करून मिळेल.
Samsung Gallery : गॅलरी App मध्ये आता साध्या शब्दात AI च्या मदतीने आपण फोटोज शोधू शकाल.
AI Select : यामुळे तुम्ही पाहत असलेल्या App/Content वर योग्य अशा फीचर्सची यादी लगेच दिसेल. उदा. जर तुम्ही कुठे मजकूर पाहत असाल तर तिथे summarize, spell-check असे पर्याय दिसतील. एखादा व्हिडिओ प्ले होत असेल तर त्याची GIF तयार करून मिळेल.
Audio Eraser : यामुळे आपल्या व्हिडिओमधील व्यक्तींच्या आवाजावर भर देऊन इतर आवाज काढून टाकता येतील!
Call Transcriptions : आपला एखाद्या व्यक्तीशी कॉल सुरू असताना त्या संवाद ओळखून त्या संभाषणाचा टेक्स्ट तयार करून मिळेल.
Personal Data Engine : यावेळी फोनच्या सुरक्षिततेसाठी सॅमसंगने खास सोयी जोडल्या असून यामुळे फोनमधील डेटा प्रायव्हेट आणि सुरक्षित राहणार आहे.
याच कार्यक्रमात Galaxy S25 Edge हा फोनसुद्धा दाखवण्यात आला पण त्याचं लॉंचिंग आणि फीचर्सबद्दल सध्या माहिती देण्यात आलेली नाही.
Samsung Galaxy S25 : 6.2-inch FHD+ Dynamic AMOLED 2X Display 120Hz refresh rate, 50 MP (Wide Main) + 12MP (Ultra-Wide) + 10MP (Telephoto), 12MP Front Camera, 4000 mAh, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, IP68, Snapdragon® 8 Elite, OneUI 7
Samsung Galaxy S25+ : 6.7-inch FHD+ Dynamic AMOLED 2X Display 120Hz refresh rate, 50 MP (Wide Main) + 12MP (Ultra-Wide) + 10MP (Telephoto), 12MP Front Camera, 4900 mAh, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, IP68, Snapdragon® 8 Elite, OneUI 7
Samsung Galaxy S25 Ultra : 6.9-inch FHD+ Dynamic AMOLED 2X Display 120Hz refresh rate, 200 MP (Wide Main) + 50MP (Ultra-Wide) + 50MP (Telephoto) + 10MP (Telephoto), 12MP Front Camera, 4000 mAh, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, IP68, Snapdragon® 8 Elite, OneUI 7
या फोन्सची भारतीय किंमत खालीलप्रमाणे :
- Samsung Galaxy S25 : ₹80,999 पासून
- Samsung Galaxy S25+ : ₹99,999 पासून
- Samsung Galaxy S25 Ultra : ₹1,29,999 पासून
S25 Ultra प्रि ऑर्डर ऑफर 256GB variant च्या किंमतीत 512GB variant मिळेल! सोबत ९००० रु Upgrade Bonus
S25+ प्रि ऑर्डर ऑफर 256GB variant च्या किंमतीत 512GB variant मिळेल!
S25 प्रि ऑर्डर ऑफर अंतर्गत फक्त ११००० Upgrade Bonus ची ऑफर आहे.
या फोन्सची Pre Order २३ जानेवारीपासून सुरू होणार असून हे फोन प्रत्यक्षात खरेदीसाठी ७ फेब्रुवारीपासून उपलब्ध होतील.