ब्लॅक मिथ: वुकाँग ही गेम सायन्स कंपनीने तयार केलेली ॲक्शन रोल-प्लेइंग गेम आहे. ही २० ऑगस्ट २०२४ रोजी प्लेस्टेशन 5 आणि विंडोज पीसीसाठी जगभरात रिलीज करण्यात आली आहे, लवकरच Xbox सिरीज X/S वर सुद्धा उपलब्ध होईल. ही गेम जर्नी टू द वेस्ट या चिनी कादंबरीपासून प्रेरित आहे. कालपासून या गेमने अनेक विक्रम मोडीत काढले असून आता ही गेम Steam या गेम स्टोअरवरील आजवरची सर्वाधिक प्लेयर्स असलेली सिंगल प्लेयर गेम ठरली आहे!
Elden Ring, Dota 2, Cyberpunk 2077, Lost Ark, Dota 2, Counter-Strike 2 आणि Palworld या सर्व गेम्सना मागे टाकलं आहे. सध्या ब्लॅक मिथ: वुकाँग एकूण गेम्समध्ये दुसऱ्या स्थानी असून तो विक्रम अजूनही PUBG या मल्टीप्लेयर गेमच्या नावे आहे. मात्र तो रेकॉर्डसुद्धा मोडला जाऊ शकतो!
सध्या ही गेम खेळणारे प्लेयर्स ९०% चीन मधून असल्याचं सांगितलं जात आहे. उर्वरित जगात जर ही गेम पुढे लोकप्रिय झाली तर तो सुद्धा रेकॉर्ड मोडला जाईल. काल नोंदवलेल्या संख्येनुसार एकाच वेळी तब्बल २२,२३,१७९ प्लेयर्स ही गेम खेळत होते. याच बाबतीत PUBG चा विक्रम ३२ लाखांचा आहे!

ब्लॅक मिथ: वुकाँग चा ट्रेलर