काल Nvidia (एनव्हिडिया) या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने चक्क गूगलच्या अल्फाबेटला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली चौथ्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे Nvidia च्या GPUs आणि AI चिप्सची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात या कंपनीची सतत वाढ होत आहे!
आत्ताच्या काळात ॲमेझॉन आणि गूगलला मागे टाकत वरती जाणं म्हणजे किती कठीण गोष्ट Nvidia ने साधली आहे याची कल्पना येईल! आपण जे लॅपटॉप्स वापरतो त्यामध्ये प्रोसेसर इंटेल किंवा AMD चा असला तरी शक्यतो बऱ्याच लॅपटॉप्समध्ये आणि पीसीमध्ये Nvidia चंच ग्राफिक्स कार्ड (GPU) असतं. मध्यंतरी बिटकॉईनची किंमत बरीच वाढली त्यावेळी तर Nvidia चे ग्राफिक्स कार्ड मिळणं अवघड झालं होतं इतकी प्रचंड मागणी होती.
मात्र आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढलेला वापर या कंपनीच्या पथ्यावर पडला असून त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट, मेटा, गूगल, ॲमेझॉन, Oracle, Tesla सारख्या सर्व आघाडीच्या कंपन्या Nvidia च्या AI Chips वापरतात! यामुळेच ही कंपनी दिवसेंदिवस अधिकच मोठी होत चालली आहे. लवकरच ही कंपनी २ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठू शकते!
त्यांचा शेयर एका वर्षात तब्बल २३१ टक्क्यांनी वाढला आहे! आत्ता या कंपनीचं मार्केट कॅपिटल ~1,50,56,200 कोटी रुपये आहे!
2,50,35,000
25,03,35,60,00,00,000
खालील इमेजमध्ये तुम्ही (हा लेख लिहीत असताना) जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या आणि पुढे त्यांचं मार्केट कॅपिटल पाहू शकता.