वनप्लसच्या काही वेळापूर्वी झालेल्या कार्यक्रमात OnePlus 12, OnePlus 12R हे फोन्स आणि OnePlus Buds 3 इयरबड्स सादर झाले आहेत! OnePlus 12R च्या किंमतीमुळे अनेक जण ४०००० च्या दरम्यान फोन खरेदी करताना नक्कीच या फोनचा विचार करतील. शिवाय OnePlus Buds 3 सुद्धा ५४९९ किंमतीत खूप चांगले इयरबड्स म्हणता येतील.
OnePlus 12R मध्ये SD 8 Gen 2 हा प्रोसेसर, 8/16GB LPDDR5X रॅम, 6.78″ QHD+ ProXDR LTPO 1.5K AMOLED, 100W SuperVooc चार्जिंग, 5500mAh बॅटरी, 128GB (UFS3.1)/256GB (UFS4.0) स्टोरेज, 50MP Main + 8MP Ultrawide + 2MP Macro आणि 16MP फ्रंट कॅमेरा असा सेटप आहे. सोबत USB2.0 पोर्ट, WiFi 7, Bluetooth 5.3, NFC
याची किंमत ३९,९९९ (8+128), ४५,९९९ (16+256) इतकी आहे. हा फोन ३० जानेवारीपासून Amazon आणि OnePlus च्या दुकानांत वर वेबसाइटवर मिळेल.
OnePlus 12 मध्ये SD 8 Gen 3 हा प्रोसेसर, 12/16GB LPDDR5X रॅम, 6.82″ 2K OLED LTPO 3.0, 100W SuperVooc चार्जिंग, 5400mAh बॅटरी, 128GB (UFS3.1)/256GB (UFS4.0) स्टोरेज, 50MP Main + 48MP Ultrawide + 64MP Tele आणि 32MP फ्रंट कॅमेरा असा सेटप आहे. सोबत USB 3.2 Gen 1 पोर्ट, WiFi 7, IR Blaster, IP65, Bluetooth 5.4, NFC, Alert Slider
याची किंमत ६४,९९९ (12+256) इतकी आहे. हा फोन ३० जानेवारीपासून Amazon आणि OnePlus च्या दुकानांत वर वेबसाइटवर मिळेल.
OnePlus Buds 3 मध्ये LHDC 5.0 Hi Res Audio, 94ms Latency, Bluetooth 5.3 Dual Dynamic Drivers, Touch Volume Control, 44 तासांची बॅटरी लाईफ, IP55 अशा सोयी दिलेल्या आहेत. याची किंमत ५४९९ असणार आहे. हे ६ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.