गेली अनेक वर्षं मागणी होत असलेली सोय म्हणजे ड्युयल सिम फोन्सवर दोन वेगवेगळे व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येणे. टेलिग्रामसारख्या ॲप्समध्ये बरेच दिवस ही सोय असून सॅमसंग, शायोमीसारख्या फोन कंपन्यानी Dual Messenger/Parallel Space सारख्या फीचर मार्फत ही सोय उपलब्ध करून दिली होती मात्र आता थेट व्हॉट्सॲपतर्फे अधिकृतरित्या ही सोय मिळणार आहे!
ही सोय प्रामुख्याने वैयक्तिक एक आणि कामकाजासाठी दुसरा व्हॉट्सॲप नंबर असलेल्यांना उपयोगी पडेल. बऱ्याच ऑफिसमधील डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी भारतात व्हॉट्सॲपचा वापर केला जातो.
यासाठी तुमच्या फोनमध्ये दोन सिमकार्डची सोय असावी (दुसरं eSIM असेल तरी चालेल).
- व्हॉट्सॲप Settings मध्ये जा
- उजव्या कोपऱ्यात तुमच्या नावासमोर एक बाण (🔽) असेल त्यावर क्लिक करा
- Add Account वर क्लिक करा.
- आता तुम्हाला नवीन दुसरं व्हॉट्सॲप अकाऊंट वापरायचं आहे तो नंबर टाका.
- आता तुम्ही तुमचा फोनवर दोन व्हॉट्सॲप अकाऊंट वापरण्यास सज्ज आहात!
- आता ज्यावेळी दुसऱ्या अकाऊंटमधील मेसेज पहायचे असतील उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्सवर क्लिक करून Switch Accounts चा पर्याय निवडा.
ही सोय आता सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली असून तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करा. जर अजूनही तुम्हाला हा पर्याय दिसत नसेल तर आणखी काही दिवस वाट पहावी लागेल.
काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप नंबर अनेक डिव्हाईसवर वापरता येईल अशी सोय आली आहे.