मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेलवर आणि फेसबुक पोस्टद्वारे शेअर केलेल्या घोषणेनुसार, व्हॉट्सॲपवर आता एचडी फोटो करता येतील. यापूर्वी फोटो पाठवल्यावर फोटो Compress करून पाठवले जायचे ज्यामुळे फोटोंची गुणवत्ता बरीच कमी झालेली असायची. आता HD चा पर्याय आल्यामुळे जसा आहे तसा फोटो पाठवता येईल. ही सोय लवकरच व्हिडिओसाठीसुद्धा येणार आहे.

Compress केल्यामुळे गुणवत्ता कमी असली तरी मात्र Compression मुळे अपलोड व डाउनलोड करण्यासाठी लागणारा इंटरनेट डेटा बराच कमी असायचा. मात्र आता वायफाय आणि स्वस्त झालेले इंटरनेट प्लॅन्स यामुळे बऱ्यापैकी युजर्सना डेटाची चिंता नसते. अशावेळी त्यांना फोटो पाठवण्यासाठी HD पर्याय मिळत आहे.
एखादा फॉर्म, स्कॅन, फोटो प्रिंट करायचा असेल तर तो as a document पाठवावा लागायचा आणि मगच तो प्रिंट करता यायचा. यामध्ये त्या फोटोचा preview किंवा thumbnail दिसत नव्हती. आता HD पर्याय वापरुन इमेज पाठवल्यामुळे इमेजचा preview सुद्धा दिसेल आणि इमेजची गुणवत्तासुद्धा चांगली असेल.
गेले अनेक दिवस हा पर्याय चाचणी आवृत्तीमध्ये उपलब्ध होता मात्र आता सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही व्हॉट्सॲप प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवरून अपडेट करून घ्या.
काही दिवसांपूर्वीच इन्स्टंट व्हिडिओ मेसेजेसचा सुद्धा पर्याय आला आहे ज्याद्वारे आपण टेक्स्ट मेसेज/ऑडिओ मेसेज प्रमाणे ६० सेकंदांची छोटी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून पाठवू शकता.
