गेले काही महिने बऱ्याच फोन कंपन्यांच्या AMOLED डिस्प्ले असलेल्या फोन्सवर काही काळ वापरल्यावर डिस्प्लेवर हिरव्या रंगाच्या उभ्या रेषा येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून आता वनप्लस कंपनीने त्यांच्या संबंधित फोन्सवर डिस्प्लेसाठी लाईफटाइम वॉरंटी देत असल्याचं जाहीर केलं आहे! त्यानुसार असा इश्यू आलेल्या फोन्सना मोफत स्क्रीन बदलून मिळेल.
OnePlus 8T, 8 Pro, 9 5G, 9R 5G या फोन्सवर ही वॉरंटी ऑफर मिळेल. या फोन्सचे स्पेयर पार्ट्स उपलब्ध नसल्याने वनप्लसने हे फोन्स परत घेऊन त्याबदल्यात वनप्लसचे इतर फोन घेण्यासाठी Voucher देण्याचा आणि सोबत जर 10R वर अपग्रेड करूण्याचा असे दोन पर्याय दिले आहेत. 10R वर अपग्रेडचा पर्याय निवडला तर ४५०० चा अधिक बोनस मिळेल.
वरील फोन्स सोडून इतर फोन्सचा (फक्त ज्यांना हा ग्रीन लाइनचा इश्यू आहे त्याच फोन्सचा) डिस्प्ले मोफत बदलून देणार असल्याचं सांगितलं आहे! यासाठी तुम्हाला जवळच्या वनप्लस सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला खालील प्रकारे ऑफर असलेलं पोस्टर दिसेल.
Product Name | Voucher Value | 10R Bonus | Total | Pickle 10R | TopUp | Discount Rate |
OnePlus 8T 8GB | 20000 | 4500 | 24500 | 34999 | 10499 | 70% |
OnePlus 8T 12GB | 20000 | 4500 | 24500 | 34999 | 10499 | 70% |
OnePlus 9 8GB | 23500 | 4500 | 28000 | 34999 | 6999 | 80% |
OnePlus 9 12GB | 23500 | 4500 | 28000 | 34999 | 6999 | 80% |
OnePlus 9R 8GB | 19000 | 4500 | 23500 | 34999 | 11499 | 67.14% |
OnePlus 9R 12GB | 19000 | 4500 | 23500 | 34999 | 11499 | 67.14% |
OnePlus 8 Pro 8GB | 25500 | 4500 | 30000 | 34999 | 4999 | 85.72% |
OnePlus 8 Pro 12GB | 25500 | 4500 | 30000 | 34999 | 4999 | 85.72% |
वनप्लसचं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र वरील फोन्सचे स्पेयर पार्ट्स दोनच वर्षात संपून जाण चांगली गोष्ट नाही.
आता वनप्लसचं पाहून इतर ब्रॅंड्सनी सुद्धा अशी ऑफर द्यायला हवी कारण गेल्या काही महिन्यात आलेल्या सर्वच ब्रॅंड्सच्या (अगदी सॅमसंगच्या फोन्सनासुद्धा) AMOLED डिस्प्ले असलेल्या फोन्समध्ये ही अडचण येत आहे! डिस्प्लेला हिरव्या रेषा येणे हा वनप्लस किंवा इतर फोन कंपन्यांकडून झालेली अडचण नसून त्या डिस्प्लेची निर्मिती करणाऱ्या कंपन्याकडून झाली आहे आणि बहुधा या सर्व फोन कंपन्या त्याच निर्मात्याकडून डिस्प्ले बनवून घेत असतील त्यामुळे अशी समस्या तयार झाली आहे.