वनप्लसचा संस्थापक असलेल्या Carl Pei याने वनप्लसमधून बाहेर पडून Nothing नावाची स्वतःची कंपनी सुरू केली असून या कंपनीचा Nothing Phone 2 फोन काल सादर झाला आहे. हा फोन कंपनीचा पहिला फ्लॅगशिप म्हणता येईल. यामध्ये आता अधिक उपयोग करता येईल अशा Glyph इंटरफेसचा समावेश आहे. हा फोन २१ जुलै पासून फ्लिपकार्टवर मिळेल. Axis बँक कार्ड धारकांना फोनच्या किंमतीवर ३००० रु अतिरिक्त सूट मिळेल.
Nothing Phone (2) मध्ये 6.7″ FHD+ 120Hz OLED डिस्प्ले, Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर, 50MP+50MP कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, आणि 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे. याची मागची बाजू पारदर्शक असून यामध्ये खास Glyph डिझाईन असलेल्या लाइट्सचा समावेश आहे! हा Glyph Interface च या फोनला सध्याच्या इतर फोन्सपेक्षा वेगळं बनवतो. आता बाकी कॅमेरा, प्रोसेसरच कामगिरी येत्या काही दिवसात समजेलच. विशेष म्हणजे ४५०००+ किंमत असूनही फोनला टेलिफोटो लेन्स आणि बॉक्समध्ये चार्जरसुद्धा नाही!
डिस्प्ले : 6.7″ FHD+ OLED display 120Hz refresh rate, HDR10+
प्रोसेसर : Snapdragon 8+ Gen1
रॅम : 8GB/12GB
कॅमेरा : 50MP Sony IMX890 + 50MP JN1 OIS+EIS
फ्रंट कॅमेरा : 32MP IMX615
बॅटरी : 4700mAh 45 watt wired, 15W wireless, 5W reverse चार्जिंग
ऑपरेटिंग सिस्टम : Android 13 Nothing OS 2.0
इतर : In-display fingerprint scanner, 5G, Bluetooth 5.3, NFC, IP54 water resistance
किंमत :
8GB+128GB ₹44,999
12GB+256GB ₹49,999
12GB+512GB ₹54,999
या फोनचा 45W चार्जर बॉक्समध्ये देण्यात आलेला नाही. बॉक्समध्ये फोन, USB केबल, स्क्रीन गार्ड मिळेल. चार्जर वेगळा घ्यावा लागेल आणि त्याची किंमत रु २४९९ आहे. फोनची किंमतसुद्धा नव्या सुविधांच्या मानाने बरीच जास्त आहे.