सोनीने नेहमीप्रमाणे त्यांच्या PlayStation Showcase या कार्यक्रमात यावर्षी येणाऱ्या गेम्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रमुख आकर्षण असलेली गेम म्हणजे Spiderman 2. अनेक जण या गेमची वाट पाहत होते. या गेमचा गेमप्ले यावेळी दाखवण्यात आला. जाहीर झालेल्या गेम्सपैकी ही गेम PS5 Exclusive असेल.
Marvel’s Spider-Man 2 सोबत पुढील गेम्ससुद्धा जाहीर झाल्या असून यामधील काही गेम्स VR हेडसेटवर खेळण्यासाठी तर काही एक्सबॉक्स व पीसीवरसुद्धा खेळता येतील.
Metal Gear Solid Delta: Snake Eater, Phantom Blade Zero, Marathon, Destiny 2: The Final Shape, Assassin’s Creed Mirage, Dragon’s Dogma 2, Alan Wake 2, Helldivers 2, Ghostrunner 2, Final Fantasy XVI – ‘Salvation’, Foamstars, Five Nights at Freddy’s Help Wanted 2, Towers of Aghasba, Revenant Hill, Sword of the Sea, Immortals of Aveum, Granblue Fantasy: Relink, Resident Evil 4 VR Mode, The Plucky Squire, Street Fighter 6 – Your Story, Neva, Cat Quest: Pirates of the Purribean, Teardown, The Talos Principle 2, Crossfire: Sierra Squad, Ultros, Beat Saber, Arizona Sunshine 2, Synapse, Concord, Fairgame$
सोनीने याच कार्यक्रमात त्यांचं नवं हँडहेल्ड गेमिंग डिव्हाइस जाहीर केलं असून Project Q नावाचं हे उपकरण तुमच्या PS5 मधील गेम्स या छोट्या स्क्रीनवर स्ट्रीम करू शकतं ज्यामुळे तुम्ही याद्वारे टीव्ही ऐवजी या हँडहेल्डवर प्लेस्टेशनवरील गेम्स खेळू शकता. यासोबत सोनीने Playstation Wireless Buds सुद्धा आणले आहेत हे इयरबड्स गेमिंग वेळेस लॉसलेस ऑडिओ ऐकवू शकतील!
खालील यूट्यूब प्लेलिस्टमध्ये जाहीर झालेल्या सर्व गेम्सचे ट्रेलर्स पाहू शकता.