या फोनमुळे बऱ्याच महिन्यांनी स्मार्टफोन बनवणाऱ्या एखाद्या भारतीय कंपनीने दखल घेता येईल असा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. उत्तम डिस्प्ले, चांगला प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, क्लीन जाहिराती नसलेलं अँड्रॉइड आणि फोनमध्ये काही बिघाड झाल्यास चक्क घरी येऊन मिळणारी फोनची Free Replacement अशा गोष्टी या फोनमध्ये मिळतील!
AGNI 2 5G मध्ये 6.78″ FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Dimensity 7050 प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB स्टोरेज, 50MP+, 66W फास्ट चार्जिंग, 4700mAh बॅटरी, Android 13, In Display Fingerprint Scanner अशा सोयी दिलेल्या आहेत. फोनला Android 14 आणि 15 हे सिस्टम अपडेट्स आणि ३ वर्षं सेक्युरिटी अपडेट्स मिळतील.
या फोनची किंमत २१९९९ इतकी असून स्पेशल ऑफर अंतर्गत बँक ऑफर्सद्वारे हा फोन १९९९९ मध्ये मिळणार आहे. याचा सेल २४ मेपासून Amazon वर सुरू होतोय…
या फोनद्वारे लावाने प्रथमच फोनमध्ये एका वर्षात हार्डवेयरची काही अडचण आली तर फोन Repair करण्याऐवजी थेट बदलून मिळेल असं जाहीर केलं आहे. शिवाय ही प्रक्रिया घरपोच केली जाईल!
या फोनमध्ये मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी या किंमतीच्या इतर कंपनीच्या फोन्समध्ये सहसा मिळत नाहीत. यामुळे लावाने त्या गोष्टीवर लक्ष देऊन तुलेनेने किंमतसुद्धा कमी ठेवली आहे. यूट्यूबवर ज्यांनी ज्यांनी या फोनबद्दल व्हिडिओ शेयर केला आहे त्यांचं या फोनबद्दल असं मत आहे की या किंमतीच्या फोन्समध्ये कॅमेरा सोडून सर्व बाबतीत हा एक चांगला पर्याय आहे. कॅमेरा सध्यातरी म्हणावा तितका चांगला नसल्याचं अनेकांना वाटत आहे.
डिस्प्ले : 6.75″ FHD+ AMOLED 120Hz HDR10+
प्रोसेसर : MediaTek Dimensity 7050
रॅम : 8GB
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 50MP + 8MP Ultrawide + 2MP Macro + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4700mAh 66W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 13
इतर : Bluetooth 5.2, 5G, USB-C to 3.5mm connector available in-box
किंमत :
8GB+256GB: ₹21,999 (बँक ऑफर नंतर ₹19,999)
Lava कंपनीच्या या फोनमुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात भारतीय कंपन्या पुन्हा त्यांचं स्थान निर्माण करू शकतील का हे पाहावं लागेल. नुसतं नावापुरतं भारतीय आणि गुणवत्ता, सपोर्ट काहीच नाही असं चित्र भारतीय ब्रॅंड्सच्या बाबत अनेक महिने दिसून येतं. लावाचा हा प्रयत्न ते बदलण्यासाठी पहिलं पाऊल म्हणता येईल!