आजच्याच दिवशी म्हणजे ३ एप्रिल १९७३ मध्ये मोटोरोलामधील इंजिनियर मार्टिन कूपर यांनी जगातला पहिला सेलफोन (वायरलेस) कॉल केला होता. या जागतिक तंत्रज्ञान विश्व बदलणाऱ्या घटनेस आता ५० वर्षं पूर्ण झाली आहेत.
मार्टिन कूपर हे स्वतः अजूनही त्यांचं आयुष्य अभिमानाने जगत असून मोटोरोलाने त्यांचा छोटासा व्हिडिओ आज या खास दिनानिमित्त प्रकाशित केला आहे. यासोबत मोटोरोलाचा प्रवाससुद्धा त्यांनी मांडला आहे. या फोन कॉलनंतरच काही वर्षांत मोटोरोलाने बाजारात उपलब्ध असलेला जगातला पहिला फोन DynaTAC सादर करण्यात आला होता. मार्टिन कूपर यांना आता सेलफोनचे जनक म्हटलं जातं!