कालपासून काही न्यूज मीडियामार्फत प्रसारित झालेल्या लेखांमुळे आज देशभरात याबद्दल बराच संभ्रम निर्माण झालेला असून आता NPCI ने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की UPI पूर्णपणे मोफत असून याद्वारे पैसे देत असताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यावा लागणार नाही.
सोप्या आणि मोजक्या शब्दात सांगायचं तर पैसे देणाऱ्यास कोणताही चार्ज लागणार नाही.
९९.९% UPI व्यवहार बँक ते बँक प्रकारचे असून यामध्ये कोणताही चार्ज नसेल.
मग १ एप्रिलपासून UPI वरचा 1.1% चार्ज नेमका कुणाला?
सध्या आपण UPI मार्फत पैसे देत असताना त्या UPI ला आपलं बँक अकाऊंट जोडलेलं असतं. आपण ज्यावेळी पैसे पाठवतो त्यावेळी आपलं फोनपे, गूगल पे सारखं ॲप UPI कडे तशी विनंती पाठवतं. मग त्यानुसार UPI तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे समोरच्या व्यक्ती/विक्रेत्याच्या बँक अकाऊंटवर पाठवतं. अशा व्यवहारावर कसलंही शुल्क (चार्ज) यापुढेही घेतला जाणार नाही. असे बँक ते बँक व्यवहार पूर्ण मोफतच असतील.
मात्र काही दिवसांपूर्वीच Prepaid Payment Instruments (PPI) म्हणजेच उदा. Paytm Wallet. यांच्याद्वारेसुद्धा UPI मार्फत पैसे पाठवता येतील अशी सोय सुरू झाली आहे. यासाठी बँक अकाऊंटची गरज उरत नाही. तुम्ही तुमच्या ऑनलाइन वॉलेटमधूनच UPI पेमेंट करू शकता.
तर हा नवा चार्ज अशा PPI मार्फत पैसे स्वीकारणाऱ्या merchants म्हणजे विक्रेत्याना आकारला जाणार आहे. … याचाच अर्थ इथेही ग्राहकांना कोणताही चार्ज नाही.
पैसे स्वीकारणाऱ्याला मात्र अशा वॉलेटमधून UPI मार्फत पैसे घेतल्यास 1.1% चार्ज द्यावा लागणार आहे. तेसुद्धा २००० च्या वरील रक्कम वॉलेट UPI ने घेतली तरच…
Paytm UPI आणि Paytm Wallet या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. Wallet मध्ये आपल्याला बँकमधून पैसे भरावे लागतात मगच ते वापरता येतं. खरंतर UPI मुळे अशा वॉलेटची गरज उरलीच नव्हती.
काही न्यूज माध्यमांनी योग्य प्रकारे खातरजमा न करता सरसकट सर्वच UPI व्यवहारांवर चार्ज लागणार अशी खोटी माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे सकाळपासून हा गोंधळ उडाला आहे.
search terms : upi charges phonepe google pay gpay paytm upi wallet