इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) तर्फे आयोजित Universal Acceptance Day च्या कार्यक्रमाचं आयोजन २७ व २८ मार्च २०२३ रोजी करण्यात आलं होतं. भारत आणि जगभरात बहुभाषिक इंटरनेटसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या माहितीची देवाणघेवाण आणि विविध चर्चासत्रं या कार्यक्रमात झाली.
National Internet Exchange of India (NIXI), Internet Corporation for Assigned Names and Numbers (ICANN), MeitY यांच्या संयुक्त विद्यमाने Universal Acceptance Steering Group (UASG) यांच्यातर्फे सर्व समावेशक आणि बहुभाषिक इंटरनेटसाठी दरवर्षी २८ मार्च या दिवशी हा ग्लोबल यूनिवर्सल ॲक्सेप्टन्स डे साजरा केला जाणार आहे.
मराठीटेक.भारत
मराठीटेकचं स्वतःचं मराठी डोमेन नेम उपलब्ध असून https://मराठीटेक.भारत या URL वर जाऊन तुम्ही मराठीटेकचा कंटेंट पाहू शकता!
मराठीटेकच्या मराठी डोमेनबद्दल सूरज बागल यांनी त्यांचा अनुभव थोडक्यात उपस्थितांसोबत शेयर केला.
यासाठी मराठीटेकला सोलापूरच्या ThinkTrans Foundation चं सहकार्य लाभलं. त्याबद्दल अक्षत जोशी यांना मनापासून धन्यवाद.
Universal Acceptance म्हणजे काय? : Universal Acceptance of Internet (म्हणजेच ‘UA’) ही एक तांत्रिक आवशक्यता आहे जी सर्व डोमेन नेम्स आणि ईमेल ॲड्रेसेस सर्व इंटरनेट आधारित ॲप्लिकेशन्स, उपकरणे आणि सिस्टम्सवर चालतील याची सुनिश्चित करते. पूर्वी केवळ लॅटिन इंग्रजी अक्षरांचा समावेश असलेल्या डोमेन्सची जागा आता सर्व भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या डोमेन्सनी घेतली आहे.
यासाठी भारतात nixi भारतातील सर्व प्रमुख २२ भाषांमधील डोमेन नेम्स उपलब्ध करून दिले आहेत. उदा. मराठीसाठी .in च्या ऐवजी .भारत वापरता येईल! याचा उपयोग इंग्रजी भाषेची ओळख नसलेल्या प्रत्येक भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत इंटरनेटवरील माहिती मिळवण्यासाठी होईल. याबद्दल अधिक माहितीसाठी https://nixi.in ला भेट द्या.
या कार्यक्रमास Tripti Sinha (ICANN Board Chair), Sally Costerton (CEO, ICANN), Dr Ajay Data (UASG Chair), Dr Subi Chaturvedi (Global SVP) या प्रमुख पाहुण्यांसह Abhishek Singh (President NeGD, MeitY), Edmon Chung (Board Director, ICANN), Jia-Rong Low (Vice President & MD, APAC, ICANN), Anil Kumar Jain (CEO, NIXI) इ. मान्यवर अधिकारीवर्गाचीही उपस्थिती होती.