वनप्लसने आज झालेल्या कार्यक्रमात बरीच उत्पादने सादर केली असून OnePlus 11, OnePlus 11R हे फोन्स, OnePlus Pad हा त्यांचा पहिलाच टॅब्लेट, OnePlus TV65 Q2 Pro हा ६५ इंची 4K टीव्ही, OnePlus Keyboard आणि OnePlus Buds Pro 2 व 2R यांचा समावेश आहे!
OnePlus 11 मध्ये SD 8 Gen 2 हा प्रोसेसर, 8/16GB रॅम, 6.7″ QHD+ Super Fluid AMOLED, 100W SuperVooc चार्जिंग जे हा फोन अवघ्या २५ मिनिटात फुल चार्ज करेल, 5000mAh बॅटरी, 128/256GB स्टोरेज, 50MP Main + 48MP Ultrawide + 32MP Tele आणि 16MP फ्रंट कॅमेरा असा सेटप आहे. याची किंमत ५६,९९९ (8+128), ६१९९९ (16+256) इतकी आहे.
OnePlus 11R मध्ये SD 8 Gen 1 हा प्रोसेसर, 8/16GB रॅम, 6.7″ QHD+ Super Fluid AMOLED, 100W SuperVooc चार्जिंग जे हा फोन अवघ्या २५ मिनिटात फुल चार्ज करेल, 5000mAh बॅटरी, 128/256GB स्टोरेज, 50MP Main + 8MP + 2MP आणि 16MP फ्रंट कॅमेरा असा सेटप आहे. याची किंमत ३९,९९९ (8+128), ४४९९९ (16+256) इतकी आहे.
OnePlus Pad : यामध्ये 11.61 इंची 144Hz LCD डिस्प्ले, 2800 x 2000 रेजोल्यूशन, 8GB/12GB LPDDR5 रॅम, 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेज, MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर, 9510mAh बॅटरी, 67W SuperVooc चार्जिंग, 552g वजन, Dolby Vision HDR अशा सुविधा आहेत. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसून प्रि ऑर्डरसाठी एप्रिल महिन्यात उपलब्ध होईल.
OnePlus Buds Pro 2 : यामध्ये आता Spatial Audio, MelodyBoost Dual Drivers, HiRes Audio, 54ms Low Latency, Fast Charge अशा सोयी देण्यात आल्या आहेत. याची किंमत Buds Pro 2R ची ९९९९ आणि Buds Pro 2 ची ११९९९ अशी असेल.
OnePlus TV 65 Q2 Pro : यामध्ये 65 इंची QLED 4K, 1200Nits Brightness, 120Hz डिस्प्ले, DCI-P3 97% Wide Color Gamut, 70W 2.1Ch Sound, Dolby Atmos, 3 HDMI ports, 2 USB ports, Dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, Google TV OS अशा सोयी मिळतील आणि याची किंमत ९९९९९ इतकी आहे!
यासोबत OnePlus ने त्यांचा किबोर्ड, OnePlus Hub 5G राऊटर सुद्धा सादर केले आहेत. शिवाय याच वर्षी त्यांचा फोल्ड करता येईल असा फोनसुद्धा येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.