BIS ने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सर्व फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्ससोबत सर्वाना वापरता येईल असा आणि एकच चार्जिंग स्पीड असलेला चार्जर द्यावा लागेल. ग्राहकांना वेगवेगळे चार्जर घेण्याची गरज उरणार नाही.
यापूर्वी युरोपियन युनियनने असा निर्णय घेतला असून त्यांनी रीचार्ज करता येणाऱ्या सर्व इलेक्ट्रोनिक वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत Type C पोर्ट देण्यासाठी मुदत दिली आहे. भारतातसुद्धा यासाठीच वाढीव तीन महिने म्हणजे मार्च २०२५ ची मुदत देण्यात आली आहे.
या मुदती पर्यंत फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, कॅमेरा, स्पीकर्स, हेडफोन्स अशा उपकरणांसोबत USB Type C चार्जर आणि त्याचं चार्जिंग स्पीडसुद्धा एकच असावं असंही सांगितलं आहे. सध्या अधिकाधिक वेगवान चार्जिंग देण्यासाठी कंपन्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र यासाठी प्रत्येक उपकरणाला वेगळा चार्जर घ्यावा लागतो आणि तो दुसऱ्या उपकरणासोबत सारखा काम करत नाही. आयफोनलासुद्धा त्यांचा वेगळा Lightning Port दिला जातो मात्र आता त्यांनासुद्धा Type C पोर्ट द्यावं लागणार आहेच.
आता हा नवा नियम लागू झाल्यावर ग्राहकांना असे वेगवेगळे चार्जर घ्यावे लागणार नाहीत.