ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात त्यांचे दोन नवे आयपॅड व आयपॅड प्रोची नवी आवृत्ती जाहीर केली आहे. नव्या आयपॅड प्रो 2022 मध्ये मॅकबुकमध्ये असलेला M2 प्रोसेसर देण्यात आला असून हा प्रोसेसर M1 च्या तुलनेत १५ टक्के अधिक वेगाने काम करतो!
नेहमीच्या बेसिक आयपॅड मॉडेलमध्ये आता A14 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 10.9 इंची डिस्प्ले, 500nits ब्राइटनेस, 12MP Landscape Front कॅमेरा जो सेंटर स्टेज सपोर्ट करेल, WiFi6, Type C Port, 5G चा पर्याय आणि उजव्या बाजूला पॉवर बटनमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर (TouchID) दिला आहे. या आयपॅडला पहिल्या जनरेशनच्या ॲपल पेन्सिलचा सपोर्ट दिला आहे. त्या ॲपल पेन्सिलला चार्ज करण्यासाठी तुम्हाला वेगळा adapter लागेल कारण ही जुनी पेन्सिल Type C वापरत नाही.
या आयपॅडची किंमत भारतात ₹४४,९०० (64GB Wifi), ₹५९,९०० (64GB WiFi+5G), ₹५९,९०० (256GB WiFi), ₹७४,९०० (256GB WiFi+5G) अशी असेल.
आयपॅड प्रोच्या नव्या आवृत्तीमध्ये M2 प्रोसेसर, 11″/12.9″ डिस्प्ले, 12.9″ मध्ये XDR डिस्प्ले, 12MP Main + 10MP Ultrawide लेन्स आणि 12MP TrueDepth फ्रंट लेन्स आहे. यावेळी या कॅमेराने चक्क ProRes फॉरमॅटमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. यासोबत WiFi6E, 5G, Bluetooth 5.3, USB Type C Thunderbolt Support सुद्धा आहेच.
नव्या आयपॅड प्रो मध्ये ॲपल पेन्सिलला Hover Experiance देण्यात आला आहे ज्यामुळे ही पेन्सिल स्क्रीनपासून 12mm वर असेल तरीही ती स्क्रीनवर टेकवल्यावर कशी दिसेल याचा अंदाज आधीच घेणं शक्य होईल.
या आयपॅड प्रोची किंमत ११ इंची WiFi मॉडेलमध्ये पुढीलप्रमाणे : ८१९०० (128GB), ९१९०० (256GB), १,१९,९०० (512GB), १५१९०० (1TB), १९१९०० (2TB)
या आयपॅड प्रोची किंमत १२.९ इंची WiFi मॉडेलमध्ये पुढीलप्रमाणे : १,१२,९०० (128GB), १,२९,९०० (256GB), १,४२,९०० (512GB), १८२,९०० (1TB), २,२९,९०० (2TB)
तसं पाहायला गेलं तर यावेळच्या आयपॅड प्रोमध्ये विशेष असं काही नवीन नाही. M2 प्रोसेसर हा अधिक पॉवरफुल असला तरी आयपॅडच्या मर्यादित ओएसमुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
ॲपलची नवी iPadOS 16.1 २४ ऑक्टोबरपासून सर्व आयपॅडवर उपलब्ध होणार आहे. यावेळी Stage Manager, Live Text, Visual LookUp, Message Editing, External Display Support अशा सोयी असतील.