मोटोरोलाने त्यांच्या Edge मालिकेत आज दोन नवे फोन भारतात सादर केले असून एक म्हणजे 200MP कॅमेरा असलेला फ्लॅगशिप फोन Edge 30 Ultra आणि दुसरा Edge 30 Fusion. Edge 30 Ultra हा 200MP कॅमेरा सेन्सर असलेला जगातला पहिलाच फोन आहे.
Moto Edge 30 Ultra मध्ये 6.67 इंची Endless Edge OLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 1250 निट्स पीक ब्राइटनेस, Snapdragon 8 Gen 1 हा प्रॉसेसर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलेलं आहे. 200MP मुख्य कॅमेरा + 50MP Ultrawide + 12MP Portrait कॅमेरा असा सेटप आहे. 60MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4610mAh बॅटरी आणि 125W Turbo Power फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. सोबत 50W Wireless Charging आणि 10W पॉवर शेयरिंगचीही यामध्ये सोय आहे. इतका नवा आणि पॉवरफुल असूनही यामध्ये केवळ 128GB च्याच स्टोरेजचा पर्याय आहे आणि SD कार्ड सपोर्टसुद्धा नाही!
या फोनची किंमत ५९९९९ असून हा फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल मध्ये २२ सप्टेंबरपासून ५४९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
या फोनसोबत Edge 30 Fusion सुद्धा सादर झाला असून यामध्ये 6.55 इंची Endless Edge pOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 1100 निट्स पीक ब्राइटनेस, Snapdragon 888+ हा प्रॉसेसर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलेलं आहे. 50MP मुख्य कॅमेरा + 13MP Ultrawide + Portrait कॅमेरा असा सेटप आहे. 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4400mAh बॅटरी आणि 68W Turbo Power फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. या फोनची किंमत ४२९९९ असून हा फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल मध्ये २२ सप्टेंबरपासून ३९९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.