भारतातील वियरेबल्स म्हणजे इयरफोन्स, स्मार्ट घड्याळे, फिटनेस ट्रॅकर्स अशा उपकरणांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत तब्बल ६६ टक्के वाढ दिसून आली आहे असं IDC ने सांगितलं आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेली कंपनी म्हणजे बोट (boAt) यांनी या क्षेत्रात ३४.३% हिस्सा मिळवला आहे. यानंतर Noise (11.5%), OnePlus (8.7%), Fire Boltt (6.8%), आणि Realme (4.6%) असा क्रम लागतो.
फक्त हेडफोन्स, इयरफोन्स या क्षेत्राचा विचार करता एकूण वियरेबल्स पैकी ७२.६ टक्के हिस्सा या ऑडिओ उपकरणांचा होता. या हीयरेबल्स क्षेत्रामधील ४२.८% मार्केट हिस्सा मिळवून पुन्हा बोट कंपनीनेनंच आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर Noise (8%), Boult Audio (6.1%), Mivi (5.4%) आणि OnePlus 4.5% यांचा क्रमांक आहे.
फक्त स्मार्ट घड्याळ (SmartWatch) चा विचार करायचा तर यामध्ये Noise कंपनीने आघाडी घेतली आहे. त्यांचा मार्केटमधी हिस्सा २८.५% इतका आहे. त्यानंतर Fire Boltt (24.8%), boAt (19.7%), Samsung (3%) आणि Titan (2.6%) यांचा क्रम लागतो.
या boAt सारख्या कंपन्या इतर जुन्या नामांकित कंपन्यांच्या पुढे जाण्याचं एकमेव कारण म्हणजे यांच्या उत्पादनांची कमी किंमत. कमी किंमतीत पुरेशा सोयी मिळाल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात स्मार्ट घड्याळे, वायरलेस हेडफोन्स-इयरफोन्सकडे वळत आहेत.
एकंदरीत मार्केटचा अभ्यास करता घड्याळांची विक्री तब्बल २९८.४ टक्के वाढली असून फिटनेस बॅंड्सची विक्री ६३ टक्क्यांनी घटली आहे! याचा अर्थ फिटनेस बॅंड ऐवजी लोक आता स्मार्ट घड्याळं वापरण्यास प्राधान्य देत आहेत.