गूगलने मे महिन्यात जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा नवा स्मार्टफोन Pixel 6a भारतात सादर केला असून या फोनची किंमत ४३९९९ इतकी असणार आहे आणि हा फोन फ्लिपकार्टवर मिळेल. लॉंच ऑफर अंतर्गत या फोनची किंमत फोन ३९९९९ पर्यंत खाली येऊ शकते. Pixel फोन्स हे त्यांच्यामधील कॅमेरासाठी प्रसिद्ध आहेत.
या फोनमध्ये गूगलचा Tensor चिप देण्यात आली आहे. यामधील बॅटरी २४ तासांपर्यंत चालेल असं गूगलने सांगितलं आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये देण्यात आलेल्या खास टूल्समुळेच हा फोन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. हा फोन २८ जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. कालपासून त्याची प्रिऑर्डर फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे.
या फोनमध्ये 6.14″ FHD+ OLED डिस्प्ले, 12.2MP+12MP ड्युयल कॅमेरा सेटप, 8MP फ्रंट कॅमेरा, 4410mAh बॅटरी, Google Tensor प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे.
हा फोन खरेदी करताना लॉंच ऑफर म्हणून Axis बँक कार्ड वापरल्यास ४००० रु सूट मिळेल. शिवाय काही खास फोन्स वर एक्स्चेंज वॅल्यू ६००० पर्यंत तर इतर सर्व फोन्सवर २००० पर्यंत मिळेल. सोबत गूगल वन आणि यूट्यूब प्रीमियमचं तीन महिन्यांचं सदस्यत्व मोफत मिळेल. गूगल वनचं 100GB क्लाऊड स्टोरेज फोटो/व्हिडिओ/फाइल्स साठवण्यासाठी वापरू शकता.
डिस्प्ले : 6.14″ FHD+ OLED display 60Hz refresh rate 20:9
प्रोसेसर : Google Tensor · Titan M2™ security coprocessor
रॅम : 6 GB LPDDR5 RAM
स्टोरेज : 128 GB storage UFS 3.1
कॅमेरा : 12.2 MP dual pixel wide camera + 12MP Ultrawide OIS+EIS
Camera Features : Magic Eraser, Real Tone, Face Unblur, Panorama, Manual white balancing, Locked Folder, Night Sight, Top Shot, Portrait Mode, Portrait Light, Super Res Zoom, Motion autofocus, Frequent Faces, Dual exposure controls, Live HDR+, Cinematic Pan
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 4410mAh
ऑपरेटिंग सिस्टम : Android 12 (5 years of Pixel updates)
इतर : In-display fingerprint scanner, 5G, Bluetooth 5.2, NFC, IP53 water resistance, WiFi6 & 6E, USB Type-C 3.1 Gen 1
किंमत :
6GB+128GB ₹43,999
Pixel Buds Pro इयरफोन्सची किंमत भारतात १९९९० ठेवली असून हे सुद्धा २८ जुलै पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील. याची बॅटरी लाईफ ११ तासांची असेल. Active Noise Cancellation with Silent Seal, Transparency mode, Wireless charging सारख्या सोयी यामध्ये देण्यात आल्या आहेत.
सध्या उपलब्ध फोन्सच्या तुलनेत पिक्सल 6a बराच महाग वाटतोय. कॅमेरा वगळता इतर गोष्टी ३० हजारांच्या फोन्समध्येही अनेक पटींनी चांगल्या मिळतात. उदा. डिस्प्ले फक्त 60Hz चा मिळतोय जो आता इतर फोन्समध्ये 90Hz तर काहीमध्ये चक्क 120Hz सुद्धा मिळतो.