पोको कंपनीने त्यांच्या Poco F1 नंतर बरेच फोन्स भारतात सादर केले आहेत पण किंमत आणि त्यामधील सोयी पाहता आजही F1 ला तसा पर्याय उपलब्ध झालेला नाही. म्हणूनन शायोमीच्या या ब्रॅंडअंतर्गत हा नवा Poco F4 5G काल सादर करण्यात आला असून यामध्येही बऱ्याच सोयी देण्यात आल्या आहेत आणि याची किंमतही तुलनेने कमी आहे.
नव्या Poco F4 मध्ये 6.67 इंची Samsung E4 SuperAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट, touch sampling rate 360Hz आणि पीक ब्राइटनेस 1300 इतकी आहे. HDR10+, MEMC, Dolby Vision सपोर्ट सुद्धा आहे. Snapdragon 870 प्रोसेसर, 6/8/12GB LPDDR5 रॅम, 128GB/256GB स्टोरेज, 64MP(OIS)+8MP+2MP कॅमेरा, 20MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी, 67W Fast Charging सपोर्ट, 10 5G Bands, Dual Stereo Speakers, NFC, IR Blaster अशा जवळपास सर्वच सोयी देण्यात आल्या आहेत. हा फोन चीनमध्ये Redmi K40S या नावाने सादर करण्यात आला होता.
या फोनची किंमत ₹२७,९९९ पासून सुरू होते. मात्र नव्या फोनच्या पहिल्या ग्राहकांसाठी त्यांनी खास ऑफर अंतर्गत ₹२३,९९९ पासून किंमत ठेवली आहे. शिवाय १००० ची सूट आणि SBI चं कार्ड वापरल्यास आणखी ३००० रु किंमत कमी होईल! हा फोन फ्लिपकार्टवर २७ जूनपासून मिळेल. सोबत या फोनवर २ वर्ष वॉरेंटी मिळणार आहे!
Buy Poco F4 5G on Flipkart : http://fkrt.it/iHsG11NNNN
डिस्प्ले : 6.67″ E4 Super AMOLED Display 120Hz
प्रोसेसर : Snapdragon® 870
रॅम : 6GB/8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS3.1
कॅमेरा : 64MP OIS + 8MP Ultrawide Camera + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 20MP
बॅटरी : 4500mAh 67W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13 Android 12
इतर : Bluetooth 5.2, NFC, Type C Port, side fingerprint sensor, IR Blaster
नेटवर्क : 5G 10 Bands, 4G
रंग : Night Black, Nebula Green
किंमत :
6GB+128GB: ₹२७,९९९
8GB+128GB: ₹२९,९९९
12GB+256GB: ₹३३,९९९