इंस्टाग्रामने टिकटॉकची आणखी एक सोय उचलत आता रील्ससाठी असलेली ६० सेकंदांची मर्यादा वाढवून आता ९० सेकंद केली आहे. यासोबत त्यांनी मेटाने इंस्टाग्राम रील्स व फेसबुक रील्सवर बऱ्याच नव्या क्रिएटिव टूल्सचा समावेश केला आहे! आता इंस्टाग्रामवरील रील्समध्येही स्टोरीप्रमाणे विविध स्टीकर्स वापरुन प्रेक्षकांसोबत अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता!
इंस्टाग्राम रील्समध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या सोयी
- ९० सेकंदांच्या रील्स : आधीच्या ६० सेकंदाची मर्यादा वाढवून आता ९० सेकंद करण्यात आली आहे.
- रील्समध्येही स्टीकर्स वापरता येणार : आजवर स्टोरीमध्ये उपलब्ध असलेले विविध स्टीकर्स आता रील्समध्ये वापरुन पोल, क्विज, इ. गोष्टी करता येतील!
- इम्पोर्ट ऑडिओ : स्वतःची ऑडिओ फाइल गॅलरीमधून इम्पोर्ट करून ती रीलला जोडता येईल.
- Templates : एखादी आवडती रील पाहून त्यानुसार स्वतःच्या रील्स तयार करणं टेंप्लेट्समुळं सोपं होईल. तयार टेंप्लेट मध्ये आपला कंटेंट टाकून लगेच रील्स तयार करता येतील.
ADVERTISEMENT
आता फेसबुकवरसुद्धा रील्स टाकता येतात. त्यासाठी त्यांनी बरेच नवे पर्यायसुद्धा आज उपलब्ध करून दिले आहेत.
फेसबुक रील्समध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या सोयी
- डेस्कटॉपवर रील्स तयार करा : iOS व अँड्रॉइडसह आता डेस्कटॉपवरील क्रिएटर स्टुडिओ मार्फत सुद्धा रील्स तयार करता येतील! शिवाय रील्स शेड्यूल म्हणजेच कधी पोस्ट करायची त्याची वेळसुद्धा सेट करून ठेवता येईल.
- Clip to Reels : जे क्रिएटर जास्त लांबीचे व्हिडिओ प्रकाशित करतात त्यांच्यासाठी या नव्या टूलद्वारे छोट्या रील्स तयार करणं सहजशक्य होणार आहे.
- नवे ऑडिओ टूल्स : साऊंड Sync सारख्या सोयी देण्यात येत असून यामुळे तुमच्या व्हिडिओ क्लिपमधील आवाजासोबत गाण्याची बीट आपोआप Sync केली जाईल. शिवाय वॉइसओव्हर देणंसुद्धा शक्य आहे!
Source: new Reels creative tools
वटपौर्णिमा कशी साजरी करावी आणि मनोरंजक माहिती नक्की वाचा.