ॲपलने काल झालेल्या त्यांच्या WWDC 22 या डेव्हलपर कार्यक्रमात त्यांच्या सॉफ्टवेयर अपडेट्स बद्दल माहिती दिली. यामध्ये आयफोन्ससाठी iOS 16, आयपॅडसाठी iPadOS 16, मॅकसाठी macOS Ventura आणि वॉचसाठी WatchOS 9 अशा नव्या व्हर्जन्सची घोषणा करण्यात आली. हे अपडेट्स सप्टेंबर महिन्यात आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध होतील. यावेळी त्यांनी त्यांचा नवा प्रोसेसर M2 सुद्धा सादर केला असून हा प्रोसेसर असलेले MacBook Air आणि Macbook Pro सुद्धा जाहीर केले आहेत!
ॲपल आयफोन्ससाठी असलेल्या iOS 16 या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बऱ्याच नव्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.
- Lockscreen : यामध्ये प्रमुख म्हणजे नवीन लॉकस्क्रीन. आता लॉकस्क्रीनवर विजेट्स जोडता येतील, वेगवेगळे वॉलपेपर्स लावता येतील त्यांना इफेक्टस देता येतील!
- Messages : मेसेजेसमध्ये आता पाठवलेला मेसेज एडिट करता येईल. शिवाय चुकून पाठवलेला मेसेज डिलिट करता येईल.
- Filter By Focus : वेगवेगळ्या ॲप्स मधील कंटेंट सेट केलेल्या फोकसनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात दिसेल
- Notification Views : आता नव्या लॉकस्क्रीनमुळे नोटिफिकेशन वरच्या भागाऐवजी खाली सहज पाहता येतील अशा ठेवण्यात आल्या आहेत.
- MultiStop Routing : ॲपल मॅप्समध्येही आता नॅविगेशन करत असताना गूगल मॅपप्रमाणे स्टॉप टाकता येणार आहेत!
ॲपल आयपॅडसाठी असलेल्या iPadOS 16 या ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टेज मॅनेजरसारख्या गोष्टी देण्यात आल्या आहेत ज्या आयपॅड वापरणं आणखी सोपं होईल.
- Stage Manager : 6K एक्सटर्नल डिस्प्ले सपोर्ट सह एकावेळी ४ अॅप्स वापरता येणार. त्यांना हवं तसं resize करून हवं तिथे ठेवून वापरता येणार!
- Reference Mode : तुमचा आयपॅड प्रो युजर्ससाठी कलर मॅच करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरता येईल!
- Game Center : खास आयपॅडसाठी गेम्स डाउनलोड करणं आणि खेळणं सोपं व्हावं म्हणून हा पर्याय देण्यात येतोय.
- Weather App : ॲपल प्रथमच आयपॅडसाठी स्वतंत्र वेदर ॲप देणार आहे!
- Freeform : हा एक मोठा डिजिटल व्हाइटबोर्ड असेल ज्यावर आपण इतरांसोबत लाईव्ह ड्रॉ करणे, टेक्स्ट लिहिणे, अशा गोष्टी करू शकतो.
यामध्ये तुमचा आयफोन लॅपटॉपचा वेबकॅम म्हणून वापरता येईल शिवाय टॉप डाऊन व्यूसाठी आयफोनचाच wide angle कॅमेरा वापरुन दोन्ही व्यू एकावेळी व्हिडिओ कॉल वर दाखवता येतील! या सुविधेला त्यांनी Continuity Camera असं नाव दिलं आहे.
Find our what’s new in iOS 16 iPadOS 16 macOS Ventura M2 Silicon Macbook Air Macbook Pro