शायोमीने बऱ्याच महिन्यांनी भारतात त्यांचा नवा टॅब्लेट आणला असून हा Xiaomi Pad 5 चीनमध्ये गेल्यावर्षीच सादर झाला होता. याचं डिझाईन बऱ्यापैकी ॲपलच्या आयपॅडसारखंच आहे. अगदी युजर इंटरफेससुद्धा जसाच्या तसाच! यामध्ये ११ इंची 2.5K LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. Snapdragon 860 हा प्रोसेसर यामध्ये पाहायला मिळेल.
डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून P3 color gamut, Dolby Vision, TrueColor आणि HDR10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा आणि 13MP चा बॅक/रियर कॅमेरा आहे. Snapdragon 860 प्रोसेसर, 6GB पर्यंत LPDDR4x रॅम, 256GB चं UFS 3.1 स्टोरेज, 8720mAh ची बॅटरी आणि सोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
इतर गोष्टींमध्ये WiFi 5, Bluetooth 5.0 आणि Type-C USB पोर्ट दिलेलं आहे. यामधील Quad Speakers ना डॉल्बी atmos चा सपोर्ट आहे. Android 12 आधारित MIUI13 चा समावेश केलेला आहे.
त्यांनी या टॅब्लेटसोबत Xiaomi Smart Pen आणि Smart Keyboard जाहीर केला आहे.
या टॅब्लेटची किंमत २६९९९ (6GB+128GB) आणि २८९९९ (6GB+256GB) अशी असणार आहे. मात्र नवीन लॉंचनिमित्त ऑफर अंतर्गत अनुक्रमे २४९९९ आणि २६९९९ या किंमतीत खरेदी करता येतील. शिवाय HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास २००० चा डिस्काउंट मिळेल. हा टॅब्लेट ३ मेपासून सर्वत्र खरेदीसाठी उपलब्ध होईल.