गूगलने अलीकडेच त्यांची गूगल प्ले स्टोअर पॉलिसी बदलली असून आता प्ले स्टोअरवरील थर्ड पार्टी ॲप्सना कॉल रेकॉर्ड करण्यापासून बंदी घालण्यात येणार आहे. गूगलने खरंतर यापूर्वीच म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्येच मायक्रोफोनद्वारे कॉल रेकॉर्ड करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर ॲप डेव्हलपर्सनी यामधून पळवाट काढत Accessibility API वापरुन कॉल रेकॉर्डिंगची सेवा देणं सुरू ठेवलं होतं मात्र आता ह्या API च्या ॲक्सेसवर मर्यादा आणल्या जात आहेत.
गूगलच्या म्हणण्यानुसार अँड्रॉइड युजर्सच्या प्रायव्हसी (गोपनीयता) आणि सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाही. ज्या ज्या फोन्समध्ये त्यांच्या native/default डायलरमध्येच कॉल रेकॉर्डिंग देण्यात आलं आहे त्यांना पुढेसुद्धा ही सोय वापरता येणार आहे. यांना आपण फर्स्ट पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्स म्हणू शकतो. बऱ्याच कंपन्या त्यांच्या फोन्समध्ये अशी सोय देतात.
त्यांच्याबद्दल गूगलतर्फे स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे याबाबत ११ मे नंतरच माहिती मिळेल.
गूगलच्या स्वतःच्या पिक्सल फोन्समध्येही कॉल रेकॉर्डिंगची सोय आहे मात्र यामध्ये समोरच्या व्यक्तीला त्यांचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे हे सांगितलं जातं! त्यांच्या Google Phone App मध्ये ही सोय आहे.
एव्हढं मात्र नक्की आहे की ACR Phone, Automatic Call Recorder असे ॲप्स यापुढे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून कॉल रेकॉर्डिंगसाठी वापरता येणार नाहीत. ट्रूकॉलरनेसुद्धा Accessibility API वापरुन कॉल रेकॉर्डिंगची सोय दिली होती. ती सुद्धा आता नव्या बदलांमुळे बंद होईल.
यामुळे व्हॉटसॲप/यूट्यूबवरील कुठल्यातरी व्हिडिओवर दिलेल्या वेगवेगळ्या असुरक्षित साइट्सवरून ॲप्स डाउनलोड करण्याचे प्रकार वाढू शकतात. ज्यामुळे फोन्समध्ये मॅलवेयर पसरवण्याचे प्रकार नक्कीच वाढीस लागतील.