Age of Empires II: Definitive Edition ही २०१९ मध्ये नव्या रूपात सादर करण्यात आलेली गेम असून याच्या नव्या Expansion मध्ये Dynasties of India पाहायला मिळणार आहेत. हे Expansion २८ एप्रिलपासून उपलब्ध होईल. ही एक रियल टाइम स्ट्रॅटेजी गेम असून आपलं सैन्य तयार करून आपलं साम्राज्याचं संरक्षण करणं त्याचा सांभाळ करणं आणि ते वाढवणं अशा गोष्टी यामध्ये करायच्या असतात.
या Expansion मध्ये तीन नव्या संस्कृती Bengalis (बंगाली), Dravidians (द्राविडीयन) आणि Gurjaras (गुर्जर) पाहायला मिळतील. यामध्ये १५ नवीन सिंगल प्लेयर मिशन्स, नव्या बिल्डिंग्स आणि सोबत अनेक नव्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे यावेळी हत्तींचं सैन्य उभं करता येणार आहे आणि मग पुढे त्यांचं नियंत्रण आणि त्यावर आधारित अर्थकारण सुद्धा पाहता येईल.
गेमची कथा प्रत्यक्ष इतिहासावर थेट आधारित नसून केवळ त्या त्या काळातील साम्राज्यांची नावे जोडून तेव्हाच्या सैन्य आणि युद्धनीतीच्या गोष्टींचा समावेश केलेला आहे.
या expansion पॅकची किंमत Steam वर ₹ २६५ इतकी आहे. मात्र यासाठी मूळ गेम जी ५२९ रुपयांना उपलब्ध आहे ती तुमच्याकडे असेल तरच expansion वापरू शकाल.
लिंक : https://store.steampowered.com/app/1869820/Age_of_Empires_II_Definitive_Edition__Dynasties_of_India/