UPI म्हणजेच Unified Payment Interface ने भारतातील व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतीच आणली आहे. आजवर आपण UPI ॲप्सच्या सहाय्याने व्यवहार करत आहोत. मात्र आता इंटरनेट नसलेल्या किंवा स्मार्ट नसलेल्या फीचर फोन्समध्येही आपण UPI मार्फत व्यवहार करू शकणार आहोत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने आज झालेल्या कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली आहे. अजूनही ४० कोटी लोक फीचर फोन्सचाच वापर करत आहेत त्यांना डिजिटल इंडियासोबत जोडण्यासाठी हा एक महत्वाचा पर्याय ठरेल असं RBI ने सांगितलं आहे.
ही सेवा वापरण्यासाठी 08045163666 या IVR क्रमांकावर कॉल करून तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
ज्या लोकांकडे फीचर फोन्स आहेत त्यांच्यासाथी ऑफलाइन म्हणजेच इंटरनेटशिवाय व्यवहार करण्यासाठी हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील फीचर फोन युजर्सना यामुळे बँक व्यवहार करणं सोपं होणार असून त्यासाठी त्यांना इंटरनेटवर अवलंबून राहायची गरज नाही.
सर्वात आधी आपल्याला आपल्या बँकेसोबत जोडलेला क्रमांक UPI123Pay सोबत जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी त्यांनी सध्या एक क्रमांक उपलब्ध करून दिला आहे त्यावर फोन करायचा आहे.
08045163666 या IVR क्रमांकावर फोन करून नोंदणीची प्रक्रिया करा आणि लगेच व्यवहार करण्यासाठी तुमचा फोन तयार असेल!
पैसे पाठवता येतात, LPG गॅस बुकिंग करता येतं, फोन रीचार्ज, Fastag रीचार्ज, EMI हप्ता भरता येतो, बँक बॅलन्स तपासता येतो.
हा क्रमांक NPCI च्या अधिकृत ट्विटमध्ये देण्यात आला असून यावर रजिस्टर केल्यास Ultracash व IDFC मार्फत सेवा दिली जात आहे असं दिसून आलं आहे. याबद्दल अधिक माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र या दोन्ही संस्था खासगी आहेत. शिवाय ही नवी सेवा फक्त इंग्लिश व हिन्दी भाषांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे जी अर्थातच मोजकी राज्ये सोडली तर ग्रामीण भागात समजण्यासाठी अवघड किंवा अशक्यच असेल. इतर भाषा लवकरच आणल्या जातील असं सांगण्यात आलं आहे.
तुमचा फोन स्मार्ट असेल तरीही तुम्ही ही सेवा वापरू शकता कधी कधी आपण इंटरनेटला स्पीड नसलेल्या ठिकाणी गेलो तर ही सेवा नक्की उपयोगी पडू शकेल. UPI ची २०१६ मध्ये उपलब्ध झालेली सेवा आता बऱ्यापैकी सर्वत्र उपलब्ध झाली असून मॉल्स, हॉटेल्स, मोठी दुकाने यापासून टपऱ्या, फिरते विक्रेते यांच्याकडेही UPI चा QR कोड दिसतोच.
यामध्ये IVR क्रमांकासोबत इतरही पर्याय येत असून आवाजावर आधारित टॅप अँड पे, मिसकॉल द्वारे पेमेंट, फीचर फोनवरील ॲप असे पर्याय लवकरच उपलब्ध होतील.
Digisaathi 24*7 हेल्पलाइन सादर
डिजीसाथी द्वारे तुम्हाला UPI संबंधी जे काही प्रश्न तक्रारी असतील त्यांचं निराकरण करून मिळेल. RTGS, NEFT, IMPS, UPI, NACH, PPI Wallets, credit, debit, prepaid cards अशा सर्व NPCI सेवांबद्दल माहिती या डिजीसाथीद्वारे देण्यात येईल.
ही सेवा वापरण्यासाठी 14431 किंवा 18008913333 या क्रमांकावर फोन करू शकता किंवा www.digitalsaathi.info या वेबसाइटवर पाहू शकता.
search terms : how to use upi123pay how send money with upi without internet