Garena Free Fire ही लोकप्रिय गेम कालपासून गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नसून सध्यातरी ही गेम दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरून डिलीट करण्यात आलेली आहे. गरेना कंपनीतर्फे याबाबत अजून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आज सर्व सोशल मीडियावर ही गेम बॅन करण्यात आली आहे अशी चर्चा सुरू झालीय!
पब्जीच्या लोकप्रियतेनंतर Garena कंपनीने त्यांची स्वतःची बॅटल रॉयाल गेम आणली होती. या Free Fire गेमला कमी क्षमतेच्या स्मार्टफोन्सवरसुद्धा खेळता येत असल्यामुळे हळू हळू ही गेम प्रसिद्ध होऊ लागली होती आणि नंतर तर पब्जी मोबाइलच बॅन झाली त्यामुळे त्यांचा बराच मोठा युजरबेस या फ्री फायर कडे वळला.
आत्ता जरी ही गेम बॅन झाली आहे अशी चर्चा असली तरी भारत सरकार किंवा गरेना कंपनी दोघांकडूनही तशी कोणतीच माहिती दिलेली नाही. यामुळे असं म्हणता येईल की सध्यातरी ही गेम तांत्रिक अडचणींमुळे काढून टाकण्यात आलेली असू शकते कारण या गेमला दोन दिवसांपूर्वी अपडेट देण्यात आलं होतं. दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ॲप स्टोअर्सवर कोणताही नियम भंग झाला की ते ॲप काढून टाकण्यात येतं तसच याबाबत घडलेलं असू शकतं.
गरेना ही कंपनी सिंगापूरची असल्यामुळे ही गेम ज्याप्रकारे चीनी ॲप्स बॅन करण्यात आले होते त्याप्रकारे तर बॅन झालेली नाही. शिवाय यांचीच Garena Free Fire Max ही गेम अजूनही गूगल प्ले स्टोअरवर आहे. (ही सुद्धा गेम ॲपलच्या ॲप स्टोअरवर मात्र नाही!)
अपडेट १४-०२-२०२२ सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार फ्रीफायर गेमसुद्धा बॅन करण्यात आलेली आहे.
Free