एसुस भारतात सध्या तरी त्यांच्या झेनफोन्स ऐवजी ROG मालिकेतील गेमिंग फोन्सवरच लक्ष केंद्रित केलं आहे. आज त्यांनी यपूर्वीच आलेल्या ROG Phone 5 चे अधिक सुविधा असलेले नवे दोन फोन मॉडेल्स भारतात सादर केले आहेत. हे दोन्ही फोन्स बाहेर गेल्यावर्षीच जाहीर झाले होते.
या फोन्समध्ये Snapdragon 888+ हा गेल्यावर्षीचा सर्वोत्तम प्रोसेसर देण्यात आला आहे. 144Hz AMOLED डिस्प्ले, फोन गरम होऊ नये म्हणून AeroActive Cooler 5 सारख्या खास सोयी यामध्ये दिल्या आहेत. 5s Pro मॉडेलमध्ये मागच्या बाजूला दुसरा डिस्प्ले दिलेला असून यावर GIF लावू शकता, notifications पाहू शकता.
हे ROG सिरिजचे फोन फक्त आणि फक्त मोबाइल गेमर्ससाठीच तयार करण्यात आले असून हे फोन्स सामान्य वापर असणाऱ्या ग्राहकांनी घेण्यात काहीच अर्थ नाही. मात्र गेमर्ससाठी फोन्स पहायचे असतील तर नक्कीच हे सर्वोत्तम फोन्स असतील.
गेमर्सना पुढे ठेवूनच यामध्ये AeroActive Cooler 5, ultrasonic AirTrigger sensors, GameFX audio system, Armoury Crate App, Game Genie overlay, AudioWizard अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे.
Asus ROG 5s Pro Specs
डिस्प्ले : 6.78″ FHD+ AMOLED E4 Display 144Hz, 1200 nits peak brightness
दुसरा डिस्प्ले : Matrix p-AMOLED
प्रोसेसर : Snapdragon 888+
रॅम : 18GB LPDDR5
स्टोरेज : 512GB UFS 3.1
कॅमेरा : 64MP Triple Camera + 13MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 24MP
बॅटरी : 6000mAh 65W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11 ROG UI
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, ultrasonic sensors for AirTrigger 5 and grip press
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Phantom Black
किंमत : 18GB+512GB ₹७९,९९९
Asus ROG 5s Specs
डिस्प्ले : 6.78″ FHD+ AMOLED E4 Display 144Hz, 1200 nits peak brightness
दुसरा डिस्प्ले : नाही
प्रोसेसर : Snapdragon 888+
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 64MP Triple Camera + 13MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 24MP
बॅटरी : 6000mAh 65W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11 ROG UI
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, ultrasonic sensors for AirTrigger 5 and grip press
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Phantom Black आणि Storm White
किंमत :
8GB+128GB ₹४९,९९९
12GB+256GB ₹५७९९९