मायक्रोसॉफ्ट प्रमुख सत्या नाडेला आणि गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई या दोघांनाही भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ट्रेड अँड इंडस्ट्री या विभागात यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती काही वेळापूर्वीच प्रकाशित झाली आहे.
विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. हा पुरस्कार पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारे दिला जातो.
यावेळी पद्म पुरस्कृत व्यक्तींची पूर्ण यादी या लिंकवर पहा https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1792640
या दोघांसोबत यावेळी सीरम इंस्टीट्यूटचे सायरस पुनावाला, भारत बायोटेकच्या सुचित्रा एला आणि टाटा सन्स ग्रुपचे एन चंद्रसेखरन यांनासुद्धा पद्मभूषण जाहीर झाला आहे.