बेबी शार्क (Baby Shark) नावाचा दक्षिण कोरियन कंपनी PinkFong ने नावाचा व्हिडिओ नोव्हेंबर २०२० मध्ये यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेला व्हिडिओ बनला होता. त्यानंतर त्या व्हिडिओने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला असून यामध्ये त्यांनी 10 Billion Views म्हणजेच १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण केले आहेत आणि असे करणारा यूट्यूबवरचा हा पहिलाच व्हिडिओ ठरला आहे!
या व्हिडिओला आत्तापर्यंत तब्बल 10,02,83,28,343 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत! Despacito या Luis Fonsi च्या लोकप्रिय गाण्याला मागे टाकत त्यांनी आता प्रथम स्थान मिळवलं होतं!
या सर्व व्ह्यूजच्या संख्येत आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली गाणी सर्वाधिक वेळा पाहिली गेली आहेत. भारतातल्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओजमध्येही हेच चित्र दिसून येतं. काही ठराविक चॅनेल्स सोडले तर लहान मुलांच्या चॅनेल्सना सबस्क्रायबर्ससुद्धा मोठ्या संख्येने आहेत. सध्या सर्वाधिक पाहिले गेलेल्या व्हिडिओच्या यादीत दहापैकी ६ गाणी लहान मुलांच्या व्हिडिओचीच आहेत!
एकेकाळी प्रथम स्थानी असलेलं Gangnam Style आता चक्क अकराव्या स्थानी गेलं आहे!
- Baby Shark Dance : Pinkfong Kids’ Songs & Stories
- Despacito : Luis Fonsi featuring Daddy Yankee
- Johny Johny Yes Papa : LooLoo Kids
- Shape of You : Ed Sheeran
- See You Again : Wiz Khalifa featuring Charlie Puth
- Bath Song : Cocomelon – Nursery Rhymes
- Learning Colors – Colorful Eggs on a Farm : Miroshka TV
- Masha and the Bear : Recipe for Disaster : Get Movies
- Uptown Funk : Mark Ronson featuring Bruno Mars
- Phonics Song with Two Words : ChuChu TV
- Gangnam Style : Psy
१ बिलियन नाही १० बिलियन होतात.
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.