रिलायन्स जिओ आणि गूगल यांनी एकतर येत खास भारतीय ग्राहकांसाठी नवा स्मार्ट स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next सादर केला आहे. हा स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी रिलायन्सच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला होता आणि गणेश चतुर्थीपर्यंत उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यानंतर चिप शॉर्टेजच कारण देत बऱ्याचदा ह्याचं लॉंचिंग पुढे ढकलण्यात आलं. सरतेशेवटी दिवाळीच्या तोंडावर हा फोन सादर करण्यात आला आहे.
या फोनमध्ये खास गूगलने अँड्रॉइडपासून तयार केलेली प्रगती ओएस (Pragati OS) देण्यात आली आहे. यामध्ये गूगल प्ले स्टोअरवरील लाखो ॲप्स वापरता येतील. सोबत यामध्ये ओव्हर द एयर अपडेट्ससुद्धा दिले जातील ज्यामुळे या फोनची कामगिरी सुधारेल आणि सुरक्षितसुद्धा असेल.
या फोनमध्ये एक उत्तम कॅमेरा दिला असल्याचं सांगत Night Mode, HDR, Portrait Mode सुद्धा देण्यात आला आहे. कॅमेरासाठी यामध्ये गूगलचं Camera Go ॲप मिळेल. गूगलने SnapChat सोबत भागीदारी करून खास भारतीय Snapchat lenses फिल्टर्स आणले आहेत!
फोनमध्ये 5.45″ HD+ डिस्प्ले, 720×1440 रेजोल्यूशन, Qualcomm Snapdragon 215 प्रोसेसर, 3500mAh बॅटरी , 2GB रॅम, 32GB स्टोरेज, ड्युयल सिम, SD Card सपोर्ट, 13MP कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. MyJio, JioCinema, JioTV, JioSaavn, JioGames सारखे जिओ ॲप्स आणि Google, YouTube, Maps, Lens असे गूगल ॲप्स इंस्टॉल केलेले आहेत. फाइल्स, फोटो, व्हिडिओ, ॲप्स शेयर करण्यासाठी Nearby Share सुविधा आहे.
या फोनची किंमत ६४९९ असणार आहे. हा खरेदी करण्यासाठी तुम्ही आधी १९९९ देऊन फोन घेऊ शकता आणि उरलेले पैसे १८ ते २४ महिन्यात भरू शकता! वरील इमेजमध्ये EMI साठी असलेले प्लॅन्स पाहू शकता.
किंमत जाहीर झाल्यावर हा फोन अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी जास्तच किंमतीमध्ये सादर झाला आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. शिवाय हा 4G फोन आहे त्यामुळे इतर फोन्सच्या तुलनेने हा फारसा स्वस्त फोन म्हणता येणार नाही मात्र यासोबत येणाऱ्या जिओ प्लॅन्समुळे काही जणांना नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.
Search Terms : Reliance Jio JioPhone Next Android Based Pragati OS Budgest Android Smartphone by Jio and Google