काही दिवसांपूर्वी भारतात पेमेंट सिस्टम संदर्भात करण्यात आलेल्या बदलांमुळे ॲपलने अधिकाधिक यूजर्सचा ॲपल आयडीचा वापर वाढावा या उद्देशाने सध्या एक ऑफर आणली असून जर तुम्ही आत्ता ॲपल आयडी मध्ये पैसे ॲड केले तर तुमच्या बॅलन्समध्ये २०% अधिक बॅलन्स ॲड झालेला दिसेल.
उदा. तुम्ही २००० रुपये ॲड केले तर ४०० रुपये अधिकचे असे एकूण २४०० रुपये ॲड झालेले दिसतील. ही ऑफर ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. या अंतर्गत ₹१०० ते ₹१५,००० रुपये ॲड करू शकता. यासोबत ॲपलने Apple ID मध्ये बॅलन्स जोडण्यासाठी Debit Card, Credit Card सह आता UPI चासुद्धा पर्याय देण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणलेल्या नव्या नियमानुसार recurring transactions साठी नवी सिस्टम आणण्यात आली आहे ज्यानुसार User Approval शिवाय हे व्यवहार होणार नाहीत. म्हणून ॲपल डेव्हलपर्सना पैसे स्वीकारण्यासाठी ॲपल आयडीचा वापर करा असं सुचवत आहे.
ॲपल आयडीचा वापर Apps, गेम्स, In-App गेम्स खरेदी करण्यासाठी करता येतो. यासोबत गाणी, संगीत, चित्रपट, पुस्तकं, वेगवेगळ्या सबस्क्रीप्शन्ससुद्धा (उदा. यूट्यूब प्रीमियम, Apple Music, Apple TV+, Spotify Premium, इ.) याद्वारे खरेदी करता येतात.
नियम व अटींची माहिती : https://apple.co/3BRC7kP