रियलमीने भारतात आज त्यांचा पहिला टॅब्लेट सादर केला असून realme Pad हा एक स्वस्त किंमतीचा टॅब्लेट असणार आहे. यामध्ये 10.4″ WUXGA+ डिस्प्ले, 7100mAh बॅटरी Helio G80 प्रोसेसर, डॉल्बी अॅटमॉस स्पीकर्स अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यासोबत रियलमीने realme 8s 5G आणि realme 8i हे दोन स्मार्टफोन्ससुद्धा यावेळी सादर केले आहेत. दोन्ही फोन्स कमी बजेट स्मार्टफोन्समध्ये नवा पर्याय म्हणून उपलब्ध होतील.
realme Pad मध्ये realme UI for Pad नावाची खास टॅब्लेटसाठी तयार करण्यात आलेली ओएस आहे. याच्या मोठ्या 7100mAh बॅटरीला चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. याच्या 10.4″ डिस्प्लेमध्ये 2000×1000 रेजोल्यूशन मिळेल. WUXGA म्हणजे widescreen ultra extended graphics array प्रकारचा डिस्प्ले यामध्ये देण्यात आलेला आहे जो फारसा चांगला नसला तरी किंमतीच्या मानाने अपेक्षित गुणवत्तेचा आहे. यामध्ये पुढे आणि मागे असे दोन्हीकडे 8MP कॅमेरा देण्यात आलेले आहेत.
यामध्ये तीन मॉडेल आणण्यात आले असून यांची किंमत 13999 (3+32GB WiFi), 15999 (3+32GB LTE) आणि 17999 (4+64GB LTE) अशी आहे. LTE मॉडेल्स मध्ये सिमकार्ड + वायफायद्वारे इंटरनेट वापरता येतं. हा टॅब्लेट १६ सप्टेंबरपासून खरेदी करता येईल.
realme 8s 5G मध्ये Dimensity 810 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 33W Dart Charge, 64MP+B&W+Macro Lens कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, 90Hz FHD+ डिस्प्ले, 6GB/8GB रॅम, 128GB स्टोरेज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत 17999 (6GB+128GB) आणि 19999 (8GB+128GB) अशी आहे. ऑफर्ससोबत हा १२५९९ आणि १३९९९ या किंमतीत मिळेल. हा फोन १३ सप्टेंबरपासून विक्रीला येईल.
realme 8i मध्ये Helio G96 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, 120Hz डिस्प्ले, 50MP+2MP+2MP कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, 4GB/6GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत १३९९९ आणि १५९९९ अशी असणार आहे. हा फोन १४ सप्टेंबरपासून विक्रीला येईल.
चीनी कंपन्या नेहमीप्रमाणे गरज नसलेल्या गोष्टींची जाहिरात करून काही गोष्टीमध्ये तडजोड करत त्यांचे नवनवे 5G फोन्स ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. अलीकडे आलेल्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या फोन्समध्ये काहीच बदल दिसून येत नाही.