मायक्रोसॉफ्टणे काल झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नव्या उपकरणांची घोषणा केली. यामध्ये Surface Laptop Studio, Surface Pro 8, Surface Pro X, Surface Go 3, Surface Slim Pen 2 आणि Surface Duo 2 हा अँड्रॉइड फोन यांचा समावेश आहे.
Surface Adaptive Kit नावाचं किट सुद्धा आणण्यात आलं आहे जे अंध, अपंग व्यक्तीना नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे. यामध्ये खास बटन्सवर लावण्यासाठी स्टीकर्स, लॅपटॉपची उघडझाप करण्यासाठी दोरी असलेले बॅंड, रंगानुसार वेगवेगळे मार्कर्स देण्यात आले आहेत.
Surface Laptop Studio : मायक्रोसॉफ्टचा हा नवा लॅपटॉप त्यांचा आजवरचा सर्वोत्तम लॅपटॉप आहे असं त्यांनी सांगितलं आहे. डेव्हलपर्स, डिझाईनर्स , गेमर्स अशा सर्वानाच वापरता येईल असा हा लॅपटॉप आहे. यामध्ये Stage Mode देण्यात आला आहे ज्यामुळे याचा डिस्प्ले आपण पुढे सरकवून ठेवू शकतो आणि त्यानंतर स्टुडिओ मोड मध्ये पूर्णच डिस्प्ले किबोर्डवर आडवा करून हा लॅपटॉप टॅब्लेटप्रमाणे वापरता येतो!
यामध्ये 14.4” PixelSense डिस्प्ले, 11th Gen Intel® Core™ H35 प्रोसेसर, NVIDIA GeForce RTX ग्राफिक्स कार्ड देण्यात आलं आहे. याची किंमत अमेरिकेत $1599.99 (~ ₹१,१८,०००) पासून सुरू होते.
Surface Pro 8 : या 2 in 1 टॅब्लेटमध्ये यावेळी अनेक बदल करण्यात आले असून यामध्ये आता 11th Gen Intel Core प्रोसेसर, 2 Thunderbolt 4 पोर्ट, १६ तासांची बॅटरी लाईफ, विंडोज ११, 13” PixelSense डिस्प्ले, 120Hz refresh rate, डॉल्बी vision, डॉल्बी साऊंड अशा जवळपास सर्वच सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत $1099.99 (~ ₹८१,२००) पासून सुरू होते.
Surface Pro X : मायक्रोसॉफ्टचा स्वतःचा प्रोसेसर असलेला हा टॅब्लेट आता विंडोज ११ आणि 64 Emulation सोबत मिळेल. शिवाय यामध्ये आता Wifi Only पर्यायसुद्धा असेल. याची किंमत $899 (~ ₹६६,४००) असेल.
Surface Go 3 : हा छोट्या आकाराचा टॅब्लेट आता इंटेलच्या प्रोसेसर्ससोबत मिळेल. 10.5” डिस्प्ले, Intel i3 प्रोसेसर, Windows 11 यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. याची किंमत $399.99 असेल.
Surface Duo 2 : मायक्रोसॉफ्टचा हा दुसरा अँड्रॉइड फोन आता मात्र चांगल्या हार्डवेअरसोबत सादर करण्यात आला आहे. Snapdragon® 888 प्रोसेसर. 8.3″ Pixelsense Fusion डिस्प्ले, ट्रिपल लेन्स कॅमेरा, नव्या पेन्सिलचा सपोर्ट अशा गोष्टी यामध्ये देण्यात आल्या आहेत. याची किंमत $1499.99 (~ ₹१,११,०००) असणार आहे.
वरील पैकी बहुतेक सर्वच उत्पादने भारतात यावर्षी येणार नाहीत. मायक्रोसॉफ्ट नेहमी प्रमाणे ही जवळपास ६ ते ८ महिने उशिरा भारतात सादर करतं आणि ते सुद्धा तिथल्या पेक्षा अधिक किंमतीत! त्यांनी हा कालावधी आणि किंमती कमी केल्याशिवाय भारतात त्यांना चांगला प्रतिसाद मिळणं शक्यच नाही. सध्या केवळ काही ठरविक प्रो यूजर्सच यांचा वापर करताना दिसत आहेत.