ॲपलने काही क्षणांपूर्वीच पार पडलेल्या कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग ॲपल इव्हेंट कार्यक्रमात नवे आयफोन्स, आयपॅड व नवं ॲपल वॉच सादर केलं आहे. यावेळी फारसं काही नवी सोय पाहायला मिळणार नसली तरी आधीच्या तुलनेत या उपकरणांची क्षमता अनेक पटीने वाढली आहे असं ॲपलने आज सांगितलं आहे. आयफोनमधील कॅमेराची जागा बदलण्यात आली आहे. शिवाय अधिक क्षमता असलेला A15 Bionic हा सर्वोत्तम स्मार्टफोन प्रोसेसर यामध्ये आहे. कॅमेरा बाबतीत फोटो व व्हिडिओसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
iPhone 13 : यामध्ये असलेल्या iPhone 13 व iPhone 13 Mini मध्ये नवा A15 Bionic प्रोसेसर, नवा OIS Tilt Shift वाईड कॅमेरा, अधिक 5G बॅंड, 2.5 तासांनी वाढलेली बॅटरी लाईफ, Super Retina XDR डिस्प्ले, सर्व कॅमेरा लेन्सवर नाइट मोड, 4K60fps HDR with Dolby Vision व्हिडिओ रेकॉर्डिंग सोबत नवा cinematic mode देण्यात आला आहे जो आपोआप चेहरा पाहून, त्याची हालचाल पाहून फोकस ॲडजस्ट करेल!
याची किंमत भारतात iPhone 13 Mini : ₹69,900 पासून सुरू आणि iPhone 13 : ₹79,900 पासून सुरू होईल.
iPhone 13 Pro : यामध्ये असलेल्या iPhone 13 Pro व iPhone 13 Pro Maxमध्ये नवा A15 Bionic प्रोसेसर, नवा OIS Tilt Shift वाईड कॅमेरा, अधिक 5G बॅंड, 2.5 तासांनी वाढलेली बॅटरी लाईफ, Super Retina XDR डिस्प्ले, 1200 Nits Brightness, 120Hz ProMotion Display, 20% लहान नॉच, नवे वाईड+टेलिफोटो+अल्ट्रा वाईड कॅमेरा, अल्ट्रावाइड मार्फत आता मॅक्रो फोटोसुद्धा काढता येणार, 4K 30fps ProRes फॉरमॅटमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सोय
याची किंमत भारतात iPhone 13 Pro : ₹1,19,900 पासून सुरू आणि iPhone 13 Pro Max : ₹1,29,900 पासून सुरू होईल.
ॲपल अजूनही आयफोन्समध्ये Type C पोर्ट दिलेलं नाही. या नव्या मॉडेल्समध्येही Lightning पोर्ट्सचाच वापर करण्यात आला आहे!
iPad 9th Gen : या बेसिक आयपॅड मॉडेल मध्ये आता 10.2″ True Tone डिस्प्ले, Gigabit LTE, 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा ज्यासोबत तुम्हाला फ्रेमच्या मध्यभागी ठेवणारी CenterStage सोयसुद्धा आहे. 1st Gen ॲपल पेन्सिल सपोर्ट, Apple A13 प्रोसेसर, iPadOS 15, अधिक स्टोरेज देण्यात आलं आहे. आता आयपॅड्समध्ये जवळपास त्याच किंमतीत अनेक नव्या सोयी मिळतील.
याची किंमत भारतात WiFi साठी : ₹30,900 आणि WiFi + Cellular साठी : ₹42,900
iPad Mini : नव्या आयपॅड मिनीमध्ये 8.3″ Liquid Retina डिस्प्ले, A15 प्रोसेसर, USB C Port, 2nd Gen Apple Pencil सपोर्ट, 5G, पॉवर बटनमध्येच टच आयडी, 12MP कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड फ्रंट कॅमेरा सोबत CenterStage सुविधा देण्यात आली आहे.
याची किंमत भारतात WiFi साठी : ₹46,900 आणि WiFi + Cellular साठी : ₹60,900
Apple Watch Series 7 : नव्या ॲपल वॉच मध्ये अधिक मोठी स्क्रीन, Curved Display, फुल किबोर्ड टायपिंग, फास्ट चार्जिंग, IP6X DustProof, WR50 Waterproofing अशा आधीच्याच पण सुधारित गोष्टी देण्यात आल्या आहेत. WatchOS मध्ये नव्या Apps सह आणखी अनेक सोयी जोडण्यात आल्या आहेत ज्या या घड्याळाला आणखी स्मार्ट बनवतील.
छान माहिती सर