काऊंटर स्ट्राइकसारख्या लोकप्रिय गेम्स बनवणाऱ्या Valve कंपनीने काल त्यांचं Steam Deck नवीन गेमिंग उपकरण आणलं असून हे एक कुठेही घेऊन जाता येईल असं पीसी गेमिंग उपकरण आहे! यामुळे निंटेंडोच्या स्वीचला आता एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. याची किंमत $399 म्हणजे जवळपास तीस हजार रुपयांपासून सुरू होते.
स्टीम डेक छोटी स्क्रीन असलेला फुल गेमिंग पीसी आहे. यामध्ये खास तयार करण्यात आलेली SteamOS आहे. याच्या हार्डवेअरसाठी ७ इंची 1280×800 रेजोल्यूशन असलेला 60hz LCD डिस्प्ले, 4 Core 8 Thread असलेला कस्टम AMD APU दिलेला आहे ज्यामध्ये GPU साठी 8 RDNA 2 compute units आहेत आणि 16 GB LPDDR5 रॅम दिली आहे. स्टीम लायब्ररीमधील सर्व गेम्स यामध्ये खेळता येणार असल्यामुळे आल्या क्षणीच हा स्वीचपेक्षा अधिक उत्तम पोर्टेबल गेमिंग उपकरण ठरत आहे. यामध्ये विंडोजसुद्धा इंस्टॉल करता येतं.
Steam Deck ला बाहेरून आपण dock जोडून त्याला एक्सटर्नल मॉनिटर, किबोर्ड, माऊससुद्धा जोडू शकता आणि मग हा एखाद्या कम्प्युटरप्रमाणे वापरता येईल. यामध्ये तीन मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. $399 (64GB), $529 (256GB), $649 (512GB) अशा किंमती असतील. 256GB आणि 512GB मॉडेल्समध्ये NVMe SSD आहेत. या वर्षा अखेरीस हे उपकरण उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे.