गेल्या महिन्यात काही ठराविक यूजर्ससाठीच BGMI म्हणजेच बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया ही गेम सादर केल्यानंतर आज सरतेशेवटी ही गेम गूगल प्ले स्टोअरवर सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाली आहे. ज्यांनी यापूर्वीच ही गेम Early Access मार्फत वापरण्यास सुरुवात केली आहे त्यांना एक अपडेट आलं असेल जे पूर्ण करताच नव्या अधिकृत आवृत्तीमध्ये वळवलं जाईल. iOS आवृत्ती मात्र अजूनही उपलब्ध झालेली नाही.
पब्जी मोबाइलवर डेव्हलपर्सचे चीनी संबंध असल्याने व त्यामधील हिंसेचे कारण देत सरकारने इतर अॅप्ससोबत यावरही बंदी घातली होती. आता Krafton या कोरियन डेव्हलपर मार्फत ही गेम पुन्हा भारतात परतली आहे. मात्र अजूनही या गेमसमोर बऱ्याच अडचणी आहेत. काही ठिकाणी अजूनही तक्रारी दाखल केल्या जात आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी अजूनही डेटा चीनी सर्व्हर्सकडे जात असल्याचंही वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर त्यांनी एका अपडेटद्वारे ही चूक सुधारली.
गेमर्सचा मात्र या गेमला पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दोन आठवड्यातच तब्बल 2 कोटी यूजर्सनी यासाठी नोंदणी केली होती. आताही या गेमचे अधिकृत आवृत्तीचे तब्बल ५० लाखाहून अधिक डाऊनलोडस झाले आहेत. लवकरच एक कोटीचा टप्पासुद्धा ओलांडू शकेल. या निमित्ताने त्यांनी गेमर्ससाठी काही खास भेटीसुद्धा दिल्या आहेत.
BGMI on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
ही गेम जरी आता पुन्हा नव्या रूपात उपलब्ध झाली असली तरी आता यामध्ये काही सूचना दिल्या जात आहेत की सलग जास्त वेळ खेळू नका, या गेमचा आणि वास्तविक आयुष्याचा संबंध नाही.
हे मुद्दे नक्कीच सर्वानी लक्षात घ्या. सध्या शाळा बंद असल्याने सर्व लहान मुले घरीच आहेत अशावेळी त्यांना लगेच ही गेम खेळायला देऊ नये कारण ही गेम 16+ मुलांसाठी डेव्हलप करण्यात आलेली आहे शिवाय याचं प्ले स्टोअरवर Content rating Strong violence अंतर्गत येतं. अनेक पालक याकडे लक्ष देत नाहीत किंवा मुलांच्या हट्टापुढे त्यांना ही गेम द्यावी लागते.
१६+ मुलांनीही मर्यादित वेळेतच ठरवून गेमचा वापर करा. याचं व्यसन लागणार नाही, यामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, यामुळे आपल्या मित्रांसोबत/ पालकांसोबत वाद होणार नाहीत याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. वरील मुद्दे नेमक्या याच गेमबाबत मांडावे लागतात कारण भारतात या गेमइतकी प्रसिद्ध दुसरी कोणतीही गेम नाही. स्ट्रीमर्सचा गेमप्ले पाहण्यात तासंतास घालवू नका. मर्यादित वेळेत आपल्या मित्रांसोबत ही गेम खेळत त्याची अधिक मजा घ्या.
KRAFTON, today launched BATTLEGROUNDS MOBILE INDIA developed exclusively for gaming enthusiasts and fans in India. After an Early Access period, BATTLEGROUNDS MOBILE INDIA is now available for download as a free-to-play multiplayer game on Google Play with an amazing array of maps, game modes, and exciting launch week challenges.