एयरटेलने आज ऑल इन वन असा एकत्रित काम करणारा Airtel Black नावाचा प्लॅन सादर केला आहे. यानुसार फिक्स्ड बंडल प्लॅन मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मोबाइल कनेक्शन, फायबर कनेक्शन आणि डीटीएच कनेक्शनसुद्धा मिळेल. या सर्वांचे पैसे एकच प्लॅनमध्ये भरले की तिन्ही सेवा वापरता येतील!
एयरटेलचे हे प्लॅन्स पाहून आपल्या गरजेनुसार निवड करु शकता. त्यामधील फायदे, ऑफर्स यांचा नक्की आपल्याला उपयोग आहे का याची माहिती घेऊन मग अशा प्लॅन्समध्ये सहभागी व्हा.
Airtel Black प्लॅन्स मधील ग्राहकांसाठी सुविधा
- एक बिल आणि एकच कॉल सेंटर
- मदतीसाठी खास टीम
- समस्या दूर करतेवेळी या प्लॅनच्या ग्राहकांना प्राधान्य
- ६० सेकंदात कॉल उचलला जाणार
- मोफत सर्व्हिस व्हिजिट्स
- डीटीएच आणि फायबर इंस्टॉलेशन मोफत
- एयरटेल Xstream Box मोफत
- एयरटेल शॉपमध्ये Buy Now Pay Later ची सोय
Airtel Black प्लॅन्स
या प्लॅनमध्ये सहभागी होण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायानुसार तुम्ही तुमचं सध्याचं मोबाइल पोस्टपेड कनेक्शन किंवा फायबर कनेक्शनला सिंगल बिल पॅकमध्ये घेऊ शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे फिक्स्ड बंडल प्लॅन जो ९९८ रुपये दरमहा दराने सुरू होतो.
- ऑल इन वन बंडल : २०९९ रुपये दरमहा : ३ मोबाइल कनेक्शन्स + १ फायबर कनेक्शन + १ डीटीएच कनेक्शन
- फायबर + मोबाइल : १५९८ रुपये दरमहा : २ मोबाइल कनेक्शन्स + १ फायबर कनेक्शन
- डीटीएच + मोबाइल : १३४९ रुपये दरमहा : ३ मोबाइल कनेक्शन्स + १ डीटीएच कनेक्शन
- डीटीएच + मोबाइल : ९९८ रुपये दरमहा : २ मोबाइल कनेक्शन्स + १ डीटीएच कनेक्शन
या प्लॅन्सच्या अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : https://www.airtel.in/airtel-black/