सोनी कंपनीने CES 2021 मध्ये जाहीर केलेला Airpeak S1 ड्रोन आता बाजारात आणत असल्याचं जाहीर केलं असून हा प्रोफेशनल ड्रोनची किंमत तब्बल $9000 म्हणजे जवळपास ₹६,५८,००० इतकी आहे! हा ड्रोन पूर्णपणे प्रोफेशनल व्हिडिओसाठी बनवण्यात आला असून यामध्ये कॅमेरा, गिंबल आणि ड्रोन अशा तिन्ही गोष्टी एकत्रित करण्यात आल्या आहेत.
सोनीचे अल्फा मालिकेतील मिररलेस कॅमेरे या ड्रोनला जोडून त्याद्वारे व्हिडिओ शूट करता येतात. हा ड्रोन कॅमेरा जोडलेला असताना १२ मिनिटे उडवता येईल तर कोणताही लोड नसताना २२ मिनिटे उडवता येऊ शकतो.
याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याची Stability आणि जोराचा वारा असतानाही उडण्याची क्षमता. हा ड्रोन 0 ते 50MPH वेग केवळ ३.५ सेकंदात पकडू शकतो. तुलना करायची तर DJI चा Matrice 600 Pro ड्रोन जो $7000 किंमतीचा आहे याचा वेग 40MPH पर्यंत आहे.
- Optimized Design for Exceptional Performance
- Powerful Flight Performance
- Sensing Technology for Flight Stability
- Versatile Camera and Lens Compatibility
- Intuitive Control
- Automated Flight for Workflow Efficiency
- Dedicated Propulsion Device and Flight Controller
- Stable Flight in High Winds
- Retractable landing gear for unobstructed camera field of view