काही दिवसांपूर्वी सॅमसंगने नवे टॅब्लेट्स भारतात सादर केले असून Tab S7 FE आणि Tab A7 Lite हे दोन टॅब्लेट वेगवेगळ्या ग्राहकांना नवे पर्याय म्हणून उपलब्ध होत आहेत. Tab S7 मालिकेत Tab S7, Tab S7+ आणि आता Tab S7 FE चा समावेश आहे. Tab S7 FE ची किंमत ४६,९९९ पासून सुरू होते तर Tab A7 Lite ची किंमत ११,९९९ पासून सुरू होते. हे टॅब उद्या म्हणजे २३ जूनपासून सॅमसंगची वेबसाइट, Samsung Exclusive Stores आणि ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्समध्येही उपलब्ध होत आहेत.
सॅमसंगचे हे दोन्ही टॅब बजेटनुसार उत्तम पर्याय आहेत. ई लर्निंगसारख्या गोष्टींमध्येही यांचा चांगला वापर करता येईल. Tab S7 FE मध्ये असलेल्या S Pen मुळे नोट्स, चित्रं काढण्यासाठीही उपयोग होऊ शकेल.
Galaxy Tab S7 FE : यामध्ये 12.4″ डिस्प्ले सोबत एक S Pen देण्यात आला आहे. 8MP कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. 4GB/6GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज, 1TB पर्यंत वाढवता येईल असं स्टोरेज, 10090mAh बॅटरी मिळेल. याची किंमत ४६९९९ (4GB+64GB) आणि ५०९९९ (6GB+128GB) अशी असणार आहे. HDFC कार्ड धारकांना ४००० कॅशबॅक आणि किबोर्ड कव्हरवर १०००० सूट मिळेल.
Galaxy Tab A7 Lite : यामध्ये 8.7″ डिस्प्ले, Android 11, 7MP कॅमेरा. 2MP फ्रंट कॅमेरा, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सोबत 5100mAh बॅटरी मिळेल. याची किंमत ११९९९ (3GB+32GB) WiFi आणि १४९९९ (3GB+32GB) LTE अशी असणार आहे.