सॅमसंगच्या लोकप्रिय Galaxy M मालिकेत Galaxy M32 हा नवा फोन काल भारतात सादर करण्यात आला असून यामध्ये sAMOLED 90Hz रिफ्रेश रेट असलेला FHD+ डिस्प्ले आहे. यामध्ये मोठी 6000mAh बॅटरी दिलेली आहे. प्रोसेसर बाबतीत मात्र काहीशी निराशा म्हणावी लागेल कारण यामध्ये तुलनेने कमी क्षमता असलेला Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत १४९९९ पासून सुरू होते.
हा फोन Amazon वर २८ जूनपासून मिळेल. ICICI क्रेडिट/डेबिट कार्ड धारकांना १२५० पर्यंत सूट मिळून हा फोन १३७४९ रुपयात मिळू शकतो. या किंमतीत सॅमसंगचा हा एक चांगला पर्याय म्हणता येईल.