क्लबहाऊस या ऑडिओ चॅट रूम ॲपची प्रसिद्धी पाहून इतर सोशल मीडिया वेबसाइट्सनेही तशीच सोय स्वतःच्या ॲप्समध्ये उपलब्ध करून दिली. ट्विटरनेही ही सोय Twitter Spaces या नावाने आणली होती. सध्या भारतात तर क्लबहाऊस पेक्षा ट्विटर स्पेसच जास्त लोकप्रिय होताना दिसत आहे. अशातच त्यांनी आता स्पेसेस डेस्कटॉप आणि मोबाइल साईटवर देखील उपलब्ध करून दिलं आहे.
याचा अर्थ असा की तुम्ही आता ट्विटर ॲप नसेल तरीही क्रोमसारख्या ब्राऊजरमधून स्पेसमध्ये सहभागी होऊ शकता. twitter.com या वेबसाइटवर हा पर्याय उपलब्ध झालेला आहे. यामुळे ही सोय वापरण्यासाठी मोबाइलला चिकटून बसायची गरज नाही आता कोणत्याही इंटरनेट आधारित उपकरणावर तुम्ही ट्विटर स्पेस जॉइन करू शकाल.
आता अनेक सेलेब्रिटी, पत्रकार, तज्ञ मंडळीसुद्धा रोजच्या रोज स्पेसचं आयोजन करून माहितीची देवाण घेवाण करत आहेत. मराठी ट्विटर विश्वातसुद्धा स्पेसेसने जोर धरलेला दिसून येत आहे.
ट्विटर स्पेसेस बद्दल अधिकृत माहिती आणि याचा वापर कसा करायचा : https://help.twitter.com/en/using-twitter/spaces