PUBG Mobile आता भारतात Battlegrounds Mobile India या नावाने परत येत आहे आणि आजपासून त्याचं गूगल प्ले स्टोअरवर प्रि रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. गेम डेव्हलपर Krafton ने दिलेल्या माहितीनुसार १८ मे २०२१ पासून नोंदणीसाठी उपलब्ध होत आहे. प्रत्यक्ष गेम हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. प्रि रजिस्टर करणाऱ्या यूजर्ससाठी खास रिवार्डस देण्यात येणार आहेत जे खास भारतीय प्लेयर्ससाठीच मर्यादित असतील.
प्रि रजिस्टरची माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये अभिनेता अर्शद वारसी आणि Dynamo, Kronten, Jonathan हे गेमर्स दिसत आहेत. हा व्हिडिओ खाली पाहू शकता.
Battlegrounds Mobile India on Google Play : play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
वरील लिंक वर जाऊन Pre Register वर क्लिक करा. गेम प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यावर आपोआप इंस्टॉल करण्याचा पर्याय निवडू शकता. पुढे गेम इंस्टॉल झाली की रिवार्डस त्या त्या प्लेयर्सच्या गेम अकाऊंटवर जमा होतील. रिवार्ड्समध्ये Recon Mask, the Recon Outfit, Celebration Expert Title आणि 300 AG चा समावेश असेल.
कंपनी तर्फे गेमर्सना आधीचं PUBG Mobile नाव वापरू नका असं सांगण्यात आलं आहे. आधीच्या चीनी डेव्हलपरमुळे पब्जीवर भारतात बंदी घालण्यात आली होती. यामध्ये अशीही माहिती देण्यात आली आहे की पब्जी मोबाइल मधील गेम डेटा या गेममध्ये आणण्यात येणार नाही. नव्या गेममध्ये सर्वांनाच पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. यावेळी गेमचा डेटा, प्रायव्हसी पॉलिसी भारतीय नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.
ही गेम अजूनही उपलब्ध झालेली नाही त्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी कोणी apk डाउनलोड करण्यासाठी देत असेल तर ते फेक असणार आहे. ते डाउनलोड करू नका त्यामध्ये व्हायरस/मालवेयर असू शकतो.
अधिकृत माहितीसाठी लिंक्स
https://www.battlegroundsmobileindia.com
https://www.facebook.com/BattlegroundsMobileIN
https://www.instagram.com/battlegroundsmobilein_official
https://www.youtube.com/channel/UCe31NPEeRGO0hcznx6Tdb-g
Search Terms : How to pre register battlegrounds mobile, new pubg mobile in india