गूगलने त्यांच्या कालपासून सुरू झालेल्या Google I/O या डेव्हलपर कार्यक्रमात अँड्रॉइडच्या नव्या आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. नव्या आवृत्ती मध्ये नवा युजर इंटरफेस, अधिक सुरक्षा, अधिक प्रायव्हसी आणि सुधारित कामगिरी पाहायला मिळेल. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आता तब्बल ३०० कोटी उपकरणामध्ये वापरली जात आहे!
गूगलने आजवर त्यांच्या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध आवृत्त्यांची नावे डेझर्ट्सवरून ठेवली होती. उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0), पाय(9.0) नंतर Android 10, Android 11 आणि आता येणाऱ्या नव्या आवृत्तीचं अधिकृत नाव Android 12 असं असणार आहे. याबद्दल काल गूगलतर्फे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
खाली दिलेल्या व्हिडिओ मधून तुम्हाला नव्या अँड्रॉइडमधील नव्या डिझाईनचा अंदाज येईल. स्वाईप डाऊन केल्यावर येणाऱ्या कंट्रोल्समधील नेहमीच्या गोल बटनांऐवजी आता मोठी आडवी बटणे पाहायला मिळतील. यामुळे फोनचा वापर आणखी सोपा होईल असं गूगलचं म्हणणं आहे.
आत्ता ही आवृत्ती अॅप डेव्हलपर्सनी त्यांचे ॲप्स डेव्हलप करण्यासाठी वापरणं सोपं जावं म्हणून दिलेली असते. या प्रीव्यू आवृत्त्या ह्या डेव्हलपरद्वारे करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठीच असतात. सामान्य यूजर्सनाही या इंस्टॉल करता येत असल्या तरी शक्यतो त्या फंदात पडू नये कारण यामुळे तुमच्या फोनमधील डेटा जाऊ शकतो किंवा फोन बिघडू सुद्धा शकतो.
आपल्यासाठी फक्त येणाऱ्या अँड्रॉइडमध्ये काय सुविधा असू शकतील याचा अंदाज येईल यादृष्टीने माहिती मिळते. सामान्य यूजर्ससाठी हे अपडेट आणखी काही महिन्यांनी त्यांच्या कंपनीने उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या फोनवर उपलब्ध होईल.
अँड्रॉइड १२ मधील नव्या सुविधा
- new UI for Android : अँड्रॉइड १२ मध्ये आपल्याला बऱ्यापैकी नवीन डिझाईन पाहायला मिळेल. गेली दोन-तीन व्हर्जन्समधील डिझाईन सारखच होतं मात्र यावेळी ते बदलण्यात आलं आहे. विजेट्स, ट्रान्झिशन्स, रंग, आकार अशा अनेक गोष्टी मध्ये नावीन्य दिसून येईल.
- Performance : नव्या अँड्रॉइड १२ ची कामगिरी सुद्धा बरीच सुधारलेली असणार आहे. ॲप्स आता आणखी लवकर उघडतील.
- Custom Theming : आपल्या आवडीनुसार पूर्ण फोनच्या सिस्टमचे रंग बदलता येतील.
- Privacy Dashboard : याठिकाणी आपल्याला कोणत्या ॲप्सना कोणती परवानगी दिली आहे आणि त्यांचा कसा वापर होत आहे हे ते समजेल.
- आता प्रायव्हसीसाठी ज्यावेळी आपला कॅमेरा किंवा माइक वापरला जात असेल त्यावेळी नोटिफिकेशन बार वर एका ठिपक्याद्वारे ते समजेल.
- आता आपल्या अँड्रॉइड फोनद्वारे क्रोमबुक अनलॉक करता येईल.
Search Terms : Android 12 beta is now live What’s new in Android 12 Beta Google I/O 2021