क्लबहाऊस (Clubhouse) हे अलीकडे चर्चेत असलेलं एक ड्रॉप इन ऑडिओ चॅट आधारित सोशल नेटवर्किंग ॲप आहे. यामध्ये यूजर्स इतर व्यक्तींमधील विविध विषयांवरील संभाषणं, मुलाखती, चर्चा ऐकू शकतात. मात्र ही चर्चा केवळ ऑडिओ स्वरूपातच असते. थोडक्यात सांगायचं तर लाईव्ह पॉडकास्टप्रमाणे हे ॲप काम करतं. यामधील सहभागसुद्धा खऱ्या क्लबहाऊस प्रमाणे ठराविक लोकांसाठीच आहे.
सध्या हे ॲप केवळ invite only म्हणजे आधीच वापरत असलेल्या व्यक्तीने जर तुम्हाला आमंत्रण दिलं तरच वापरता येईल असं आहे. शिवाय हे ॲप फक्त आयफोन – iOS वरच उपलब्ध आहे. अँड्रॉइड आवृत्ती लवकरच आणणार आहोत असं कंपनीने सांगितलं आहे. हे ॲप Alpha Exploration कंपनीच्या Paul Davison आणि Rohan Seth यांनी बनवलं आहे.
Download Clubhouse for iOS : https://apps.apple.com/us/app/id1503133294
Clubhouse is a space for casual, drop-in audio conversations—with friends and other interesting people around the world.
जर तुम्ही invite मार्फत जॉइन होऊ शकत असाल तर ते झाल्यावर तुम्हाला आवडीचे विषय निवडावे लागतील मग त्यानुसार व्यक्ती/ग्रुप्स असलेल्या Rooms तुम्हाला सुचवल्या जातील ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन ऐकण्यास सुरुवात करू शकता. समजा एखादी कॉन्फरन्स सुरू आहे आणि यामध्ये केवळ काही लोक बोलतील तर उर्वरित लोक फक्त ऐकू शकतील. यामधील Room मध्ये ५००० लोकांचा ग्रुप तयार करता येऊ शकतो.
कोणत्याही रूममध्ये ड्रॉप इन करून म्हणजे जाऊन तुम्ही पर्याय उपलब्ध असेल तर बोलू सुद्धा शकाल जसे की प्रश्न विचारणे इ. किंवा केवळ ऐकत सुद्धा बसू शकता. तुम्ही Raise a Hand पर्याय वापरुन मला बोलायच आहे असं त्या रूमच्या admin ला सांगू शकता त्यांनी जर परवानगी दिली तर तुमचं बोलणं इतराना ऐकू जाईल. यामध्ये आवडत्या व्यक्तींना फॉलो सुद्धा करता येतं.
इतर लोकांचं संभाषण आपण न बोलता ऐकत राहणं हेच या ॲपच्या अल्पावधीत लोकप्रिय होण्याचं कारण म्हणता येईल. ठराविक काही महिन्यांनी एखादं ॲप येऊन मोठी लोकप्रियता मिळवतं त्यामधील सर्वात नवीन ॲप हेच म्हणता येईल. यावर इलॉन मस्कची सुद्धा मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीनंतरच याची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली.
क्लबहाऊसची लोकप्रियता पाहून मोठ्या कंपन्यानीही त्यांच्या सेवांमध्ये कॉपी करत क्लबहाऊससारखी सुविधा दिली आहे. यामध्ये Facebook (Hotline), Twitter (Twitter Spaces) , Discord (Discord Stage Channels), Spotify आणि Slack यांचा समावेश आहे. काही कंपन्यानी हे ॲप विकत घेण्यासाठी तब्बल ४ बिलियन डॉलर्सदेण्याचीही तयारी दर्शवली आहे अशी माहिती आली होती.
अचानक चर्चेत आल्यावर हॅकर्सची याकडे नजर वळली नसती तर नवलच. याच महिन्यात तब्बल १३ लाख यूजर्सचा डेटा लीक झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती लीक झालेली नाही असं दिसून येत नाही. मात्र प्रोफाइल्सची एकत्रित माहिती हॅकर्सकडे गेली आहे.
संदर्भ : joinclubhouse.com, The Guardian, Wikipedia
Search Terms : What is clubhouse, How to join clubhouse app
Hi, your blog is really nice and nicely helps us. You need more online presence in your website to help us for get knowledge.
also see my articles.