मोटो कंपनीने त्यांचे नवे स्मार्टफोन्स आज भारतात सादर केले असून यांची किंमत फीचर्सच्या तुलनेत कमी ठेवण्यात आली आहे. Moto G60 आणि G40 Fusion मध्ये कमी किंमतीत 120Hz डिस्प्ले, Snapdragon 732G आणि मोठी बॅटरी मिळत आहे. सध्या लेनेवोकडे मालकी असलेल्या या कंपनीची रेडमी आणि रियलमीच्या नव्या फोन्ससोबत स्पर्धा असणार आहे.
Moto G60 मध्ये 108MP+8MP+2MP कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा, 6.8″ FHD+ LCD 120Hz HDR10 डिस्प्ले, Snapdragon 732G प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, 20W चार्जर, 4GB/6GB रॅम मिळेल आणि या फोनची किंमत १३९९९ (4GB+64GB) आणि १५९९९ (6GB+128GB). हा फोन १ मे पासून फ्लिपकार्टवर मिळेल.
Moto G40 Fusion मध्ये 64MP+8MP+2MP कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, 6.8″ FHD+ LCD 120Hz HDR10 डिस्प्ले, Snapdragon 732G प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, 20W चार्जर, 6GB रॅम मिळेल. या फोनची किंमत १७९९९ आहे. हा फोन २७ एप्रिल पासून फ्लिपकार्टवर मिळेल.
लॉंच ऑफरसाठी ICICI Credit व Debit कार्ड धारकांना १५०० पर्यंत अधिक सूट मिळणार आहे!