गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोना रोगाचा प्रसार दुसऱ्या लाटेमुळे आता आणखी तीव्र झाला आहे. यावेळी आरोग्य व्यवस्थेवर बराच ताण येताना दिसत असून अनेकांना बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन्स मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. यामध्ये काही प्रमाणात काळाबाजार होण्याचंही प्रमाण दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून सरकार, वैद्यकीय संस्था व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत ऑनलाइन मदत केंद्रे तयार केली आहेत ज्यामार्फत आपण आपल्या शहरातील गरजेनुसार माहिती मिळवू शकाल. याद्वारे रुग्णांना शक्य तेव्हढी मदत करण्यात येत आहे.
आम्ही काही ऑनलाइन वेबसाइट, सोशल मीडिया यांच्या लिंक्स, क्रमांक देण्याचा प्रयत्न करत आहोत. ही माहिती शक्य तितकी अधिकृत असल्याची खात्री करून पोस्ट करत आहोत.
शिवाय खाली काही काळजी घेण्याबद्दल मुद्देसुद्धा जोडत आहोत ते सुद्धा नक्की पाहून घ्या.
कोरोना/COVID19 लसीकरणासाठी नोंदणी
https://cowin.gov.in या वेबसाइटवर केंद्र शोध, नोंदणी करता येईल.
कोरोना लक्षणं आढळल्यास चाचणी करण्यासाठी केंद्र शोधा
- गूगलवर covid 19 testing असं सर्च केल्यावर तुमच्या जवळ असणाऱ्या टेस्टिंग सेंटर्सची माहिती दर्शवली जाईल. तिथे कशी प्रक्रिया असेल याचीही थोडी माहिती दिलेली आहे.
महाराष्ट्र सरकार
- COVID-19 ची रोजची माहिती : COVID-19 Dashboard by Government of Maharashtra : https://www.covid19maharashtragov.in/mh-covid/dashboard
- हॉस्पिटल्सची माहिती : Maharashtra State-Dedicated COVID Facilities-Logistic Report : https://arogya.maharashtra.gov.in/1177/Dedicated-COVID-Facilities-Status
- रक्तासंबंधित माहितीसाठी : Maharashtra Blood Transfusion Council : http://mahasbtc.org/sbtc
- प्लास्मा दान करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी DONATE or REQUEST PLASMA : https://plasma.mahasbtc.org
- Maha Arogya IEC Bureau Facebook : https://www.facebook.com/MahaArogyaIECBureau
- Maha Arogya IEC Bureau Twitter : https://twitter.com/mahahealthiec
- MAHARASHTRA DGIPR : https://twitter.com/MahaDGIPR : विविध सरकारी आदेश, घडामोडी, रिपोर्टस यांची अधिकृत माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी COVID-19 मध्ये आपली मदत देण्यासाठी अधिकृत ऑनलाइन पर्याय (महाराष्ट्र राज्य)
UPI ID : cmrfmahacovid19@sbi
Name of the Account : Chief Minister’s Releif Fund Covid19
Account Number : 39239591720
Branch : State Bank of India, Mumbai main Branch, Fort Mumbai Code : 00300
IFSC : SBIN0000300
शिवभोजन थाळी केंद्र यादी : List of ShivBhojan Thali Centers
या योजनेद्वारे सध्या गरीब व गरजू जनतेला मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यादी पाहण्यासाठी अधिकृत लिंक : http://mahaepos.gov.in/ShivBhojanTrans.jsp
भारत सरकार
आरोग्य मंत्रालय अधिकृत वेबसाइट : https://www.mohfw.gov.in
आरोग्य मंत्रालय अधिकृत ट्विटर हॅंडल : https://twitter.com/MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona : https://www.mygov.in/covid-19
#MahaCovid मोहीम
सध्या ट्विटरवर सर्व मराठी हँडल्सनी एकत्र येत #MahaCovid हा हॅशटॅग सुरू केला आहे. याअंतर्गत ट्विटस मार्फत मदत केली जात आहे. कोव्हिडसंदर्भात बेड/ऑक्सिजन/औषधं/व्हेंटिलेटर कोणत्याही गोष्टी मिळविण्यात अडचण येत असेल तर तुमचे प्रश्न किंवा माहिती ट्वीट करा आणि सोबत #MahaCovid तसंच #Sosशहराचेनाव असे हॅशटॅग जोडा असं सांगण्यात आलं आहे.
मराठी चित्रपट कलाकार स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे यांनी ट्विटर अकाऊंटचा वापर या कारणासाठीच करणार असल्याचं जाहीर केलं आहे. कबड्डी संघ U Mumba आणि फुटबॉल संघ Mumbai City FC यांनीही त्यांची सोशल मीडिया या कामासाठी वापरत असल्याचं सांगून त्यानुसार ट्विट्ससुद्धा केल्या आहेत. शिवाय उर्मिला मातोंडकर, सुहृद गोडबोले, निखिल महाजन यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला आहे. यांच्यासोबत इतरही अनेकांनी आता शक्य ती मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे.
गूगल COVID-19 Information Centre
- गूगलवर covid 19 testing किंवा coronavirus testing असं सर्च केल्यावर तुमच्या जवळ असणाऱ्या टेस्टिंग सेंटर्सची माहिती दर्शवली जाईल. तिथे कशी प्रक्रिया असेल याचीही थोडी माहिती दिलेली आहे.
- गूगलवर COVID-19 vaccine असं सर्च केल्यावर तुमच्या जवळ असणाऱ्या लसीकरणाची माहिती दर्शवली जाईल.
फेसबुक Coronavirus (COVID-19) Information Centre
https://www.facebook.com/coronavirus_info/
ट्विटर COVID-19 Information Centre
https://twitter.com/explore/tabs/covid-19
ट्विटरवर कशी माहिती मिळवायची हे पहा : https://twitter.com/TwitterIndia/status/1386608572377694210
इतर
मायक्रोसॉफ्ट बिंग मराठी कोविड ट्रॅकर : bing.com/covid/local/india?setlang=mr
खाली काही मुद्दे मांडत आहोत ते एकंदरीत सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा थोडासा अंदाज घेऊन व्यक्त केलेले आहेत. प्रत्यक्ष माहितीसाठी तज्ञांची मदत घेऊनच पाऊल उचला.
- सध्या लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे त्याचं काटेकोर पालन करा. अतिशय गरज असल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.
- वस्तु, भाजीपाला, किराणा, औषधे, जेवण घरपोच देण्यासाठी अनेक ठिकाणी नव्या सोयी करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन डिलिव्हरी सेवांचा उपयोग करा.
- बाहेर पडणार असाल तर मास्क नक्की घाला आणि तो घरी आल्यावरच काढा. घरी आल्यावर प्रवेश करण्याआधी हात sanitizer ने धुवून प्रवेश करा.
- बाहेर जाऊन आल्यावर हात, पाय, तोंड धुवून घ्या.
- रोजचा सकस आहार घ्या. प्रतिकारशक्ती वाढेल असा आहार डॉक्टरांसोबत बोलून त्यानुसार घ्या.
- फोन/टीव्ही/लॅपटॉप अशा उपकरणांवर आपण कोरोना संबंधित काय माहिती पाहता यावर नियंत्रण ठेवा. बातम्या पाहणं मर्यादित ठेवा.
- जास्त घटना/बातम्या पाहून भीती निर्माण होऊ शकते. पुढे चुकून आपणच +ve झालो तर मनात आणखी भीती वाटण्यास सुरुवात होऊ शकते.
- घरी राहून शक्य तितकं मनोरंजनात्मक व्हिडिओ, गाणी पाहण्याचा प्रयत्न करा.
- व्हॉट्सॲपवरील मेसेज, स्टेट्स पाहत बसू नका. काही लोकांना विनाकारण अफवा पसरवण्यात आनंद वाटत असतो. त्यांच्यापासून, त्यांच्या मेसेजेसपासून दूर रहा.
- वारंवार कोरोना माहिती, मृत्यू, पॉसिटीव संख्या पाहू नका. याचा नकारात्मक परिणाम होतो.
- लक्षात घ्या या रोगामधून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या सुद्धा खूप मोठी आहे.
- जर आपल्याला दुसरे आजार असतील तर मात्र आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल.
- घरातील वृद्ध व्यक्ती, आई वडील यांना शक्य तितक्या लवकर लस देण्याचा प्रयत्न करा.
- लसीविषयी अफवांवर विश्वास ठेवून लस घेणं टाळू नका.
- जर काही शंका असेल तर आपल्या डॉक्टरकडे संपर्क साधून शंका निरसन करून घ्या.
- लसींचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे. कोणती लस घेतली त्यानुसार त्यांचे दिवस पाहून लस घ्या.
- लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना होऊ शकतो हे खरं असलं तरी आजवर उपलब्ध असलेल्या सर्वच लसीबाबतही असंच म्हणावं लागेल.
- सामान्य माहितीनुसार अमुक रोगावर १००% यश मिळेल अशी लस कोणत्याही आजारावर उपलब्ध नाही. मग हा कोरोना तर तुलनेने नवा रोग आहे.
- म्हणूनच लस घेतल्यावरही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.
- १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना लस मिळणार आहे मात्र त्यांची उपलब्धता साहजिकच पुरेशी नसणार आहे.
- लसीकरणासाठी जाताना उपलब्धतता, गर्दी यांचा अंदाज घेऊन मग जा. तिथे असतानाही योग्य ती काळजी घ्या.
- व्हॉट्सॲपवरील मेसेज वाचून त्रास/दुखणं अंगावर काढायला जाऊ नका. अशा गैरसमजातूनच यावेळी जास्त जीव गेल्याचं पाहायला मिळत आहे.
- लक्षणं जाणवल्यास किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर लगेच चाचणी करून घ्या.
- चाचणी केल्यावर रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण करून रहा.
- रिपोर्ट +ve आल्यावर डॉक्टरांना संपर्क साधून योग्य ती व्यवस्था करून पहा.
- किती त्रास आहे याचा अंदाज घेऊन डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे पुढील पाऊल उचला.
- कमी त्रास असलेल्या व्यक्तीना विलगीकरण केंद्र किंवा शक्य नसेल तर घरीच Quarantine केलं जात आहे.
- अशावेळी आहारावर जास्त लक्ष द्या. सकारात्मक विचार करत रहा. जर कोणी अॅडमिट असतील तर त्यांना फोनवरून व्हिडिओ कॉल करून आधार देत रहा.
- कोव्हिड संदर्भात बेड/ऑक्सिजन/औषधं/व्हेंटिलेटर अशा गोष्टी मिळवण्यात स्थानिक माहिती हवी असेल तर तुमचे प्रश्न किंवा माहिती संबंधित ठिकाणी ट्वीट करा
- मदत मागते वेळी जिल्हाधिकारी, आयुक्त, आरोग्य अधिकारी, आमदार, नगरसेवक, सामाजिक संस्था यांना टॅग करू शकता.
- ज्यांची वरीलपैकी गोष्ट मिळाली आणि गरज संपली की मग ट्विट्स, मेसेजेस डिलिट करा जेणेकरून पुढे इतराना मदत पुरवणे सोपे होईल.
- Remdesivir सारख्या औषधे आता फक्त हॉस्पिटलमध्येच उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून खरेदी करण्यास जाऊ नका. त्यामार्फत नकली औषधं देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. खाजगी रुग्णालयात याचं वितरण जिल्हाधिकारी यांच्यातर्फे होत आहे.
- Remdesivir मिळाल्यावर जीव वाचेलच असं नाही. हे जीवरक्षक औषध नाही असं अनेक डॉक्टर्सनी व सरकारतर्फेही अधिकृतरित्या सांगितलं आहे. हे औषध रिकव्हर होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करतं.
- अशा काळात सुद्धा काही महाभाग गैरफायदा घेताना दिसून येत आहे. असे प्रकार दिसून आल्यास संबंधित प्रशासन. पोलिस, मीडिया यांना कळवा. स्वतःला गरज असेल तर योग्य ती खात्री करूनच खरेदी करा. आपली फसवणूक होऊ देऊ नका.
- मदतीची विनंती करत असताना सामाजिक भान बाळगून इतर अनावश्यक गोष्टी टाळा.
वरील लेख तंत्रज्ञानावर आधारित नसला तरी सध्याची वेळ पाहता गरजेचा आहे आणि म्हणून जनहितार्थ ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. या लेखामधील माहिती चुकीची आढळल्यास किंवा आणखी काही माहिती/मुद्दे जोडायला हवे असं वाटल्यास आम्हाला नक्की कळवा.