पोको या शायोमीच्या उपब्रॅंड असलेल्या कंपनीचा फोन Poco X3 Pro आज भारतात सादर झाला असून यामध्ये कमी किंमतीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये Snapdragon 860 प्रोसेसर, 120Hz LCD डिस्प्ले, 6GB/8GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज, 5160mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंग, 48MP+8MP+2MP+2MP असा कॅमेरा सेटप मिळेल. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होत असून याची किंमत १८९९९ पासून सुरू होते!
Poco X3 Pro मध्ये 3.5mm audio jack, IR blaster, Bluetooth 5.0, UFS3.1 Storage, LiquidCool Technology Plus आणि Wi-Fi 5 चा समावेश आहे. Steel Blue, Graphite Black आणि Golden Bronze या रंगात हा फोन उपलब्ध असेल.
यामध्ये असलेले प्रोसेसर Snapdragon च्या फ्लॅगशिप मालिकेतील असला तरी हा 855+ चच नाव बदलून 860 करण्यात आलेला प्रोसेसर आहे. थोडक्यात सांगायचं तर हा दोन वर्ष जुना प्रोसेसर आहे. मात्र सध्याच्या ह्या किंमतीच्या दरम्यान उपलब्ध फोन्सच्या मानाने हा नक्कीच बराच वेगवान आहे. शिवाय या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असला तरी हा डिस्प्ले AMOLED नाही त्यामुळे काही जणांनी नाराजी दर्शवली आहे. असं असलं तरीही हा फोन नक्कीच २०००० पेक्षा कमी किंमत असलेल्या फोन्समध्ये सर्वात पॉवरफुल म्हणता येईल असा नक्कीच आहे.
याची किंमत १८९९९ (6GB+128GB) आणि २०९९९ (8GB+256GB) अशी आहे. या फोनवर लॉंच ऑफर्स असून यामुळे हा फोन ICICI Credit Card धारकांना १७९९९ मध्ये मिळू शकेल.
Poco F1 यूजर्ससाठी खास ऑफर्स असणार असून या ऑफर्स १ एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहेत.