लघु आणि मध्यम व्यवसाय करणाऱ्याना पैसे स्वीकारणं आणखी सोपं व्हावं या उद्देशाने Paytm ने आज नवी सोय दिली असून Paytm Smart POS असं या सेवेच नाव असेल. यामुळे NFC असलेला कोणताही अँड्रॉइड फोन पॉइंट ऑफ सेल (POS) मशीन प्रमाणे वापरता येईल. POS मशीन्स म्हणजे अशी उपकरणे जी आपण डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी दुकाने, मॉल्स, पेट्रोल पंप अशा ठिकाणी पाहिली असतील. थोडक्यात तुमचा फोनच कार्ड स्वाईप मशीन म्हणून वापरता येईल.
व्यावसायिक आता पेटीएमद्वारे POS मशीन नसताना सुद्धा NFC मार्फत ग्राहकांकडून पैसे स्वीकारू शकतील. ही सोय वापरण्यासाठी ग्राहक त्यांचं कार्ड दुकानदाराच्या फोनवर टॅप करतील. हे करण्यासाठी दोन्ही फोन्स / फोन व कार्डवर NFC नावाची सोय असायला हवी. मध्यम किंमतीच्या फोन्स मध्ये शक्यतो ही सोय दिलेली असते. NFC म्हणजे Near Field Communication. NFC वरच हे चालणार असल्यामुळे त्या प्रकारचे कार्ड असेल तरच ही सोय उपयोगी पडेल हे लक्षात घ्या.
या सोयीद्वारे Visa, Mastercard आणि काही काळाने Rupay हे प्लॅटफॉर्म असलेले कार्डस चालणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त ५००० रुपयांचा व्यवहार करण्याची मर्यादा असणार आहे.
गेल्या काही महिन्यात पेटीएमने अनेक नव्या सोयी आणल्या आहेत. उदा. All in one QR, Paytm Soundbox. आजच्या कार्यक्रमात त्यांनी SoundBox 2.0 सुद्धा सादर केला आहे. हा बॉक्स ग्राहकांनी पेमेंट केल्यावर त्याची माहिती मोठ्या आवाजात सांगतो त्यामुळे दरवेळी दुकानदारांना फोन तपासत बसावं लागत नाही. याच्या नव्या आवृत्तीमध्ये QR Code, अधिक चांगला आवाज, डिजिटल डिस्प्ले आणि ऑडिओ समरी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. हे व्यावसायिकांसाठी नक्कीच खूप उपयोगी पडेल असं उपकरण आहे. यामध्ये सध्या मराठी उपलब्ध नसली तरी लवकरच मराठी भाषा जोडण्यात येईल असं पेटीएमने जाहीर केलं आहे.
Paytm SoundBox 2.0 व्हिडिओ : https://youtu.be/x6FMCfyy1E8
Good