वनप्लसने त्यांचे नवे स्मार्टफोन्स सादर केले असून यामध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि वनप्लस 9R. यावेळी कॅमेराबाबत सुधारणा करण्यासाठी हॅसलब्लॅड कंपनीसोबत भागीदारी केली आहे. डिस्प्ले 120Hz, 5G नेटवर्क, 65W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट सुविधा देण्यात आल्या आहेत.
OnePlus 9 Pro मध्ये सध्याचं सर्वात वेगवान वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग देण्यात आलं आहे. यामधील वायरलेस चार्जिंग 50W चार्जिंग असणार आहे! Snapdragon 888 प्रोसेसर, 6.7″ QHD+ LTPO 120Hz डिस्प्ले, 48MP+50MP+8MP+2MP कॅमेरा सेटप, 8K 30fps, 4K 120fps व्हिडिओ, 16MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी, 8GB/12GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत 64999 (8GB+128GB) आणि 69999 (12GB+256GB) अशी असणार आहे.
OnePlus 9 मध्येही सध्याचं सर्वात वेगवान वायर्ड चार्जिंग देण्यात आलं आहे. Snapdragon 888 प्रोसेसर, 6.55″ QHD+ LTPO 120Hz डिस्प्ले, 48MP+50MP+2MP कॅमेरा सेटप, 8K 30fps, 4K 60fps व्हिडिओ, 16MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी, 8GB/12GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत 49999 (8GB+128GB) आणि 54999 (12GB+256GB) अशी असणार आहे.
OnePlus 9R हा तिन्हीपैकी स्वस्त फोन असणार आहे. यामध्येही सध्याचं सर्वात वेगवान वायर्ड चार्जिंग देण्यात आलं आहे. Snapdragon 870 प्रोसेसर, 6.55″ 120Hz डिस्प्ले, 48MP+16MP+5MP+2MP कॅमेरा सेटप, 4K 60fps व्हिडिओ, 16MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी, 8GB/12GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत 39999 (8GB+128GB) आणि 43999 (12GB+256GB) अशी असणार आहे.
गेमिंगसाठी वनप्लसने नवे ट्रिगर्ससुद्धा आणले आहेत. शिवाय यावेळी OnePlus Watch सुद्धा आणलं आहे.